VIDEO- पोषण आहाराच्या शिरा पाकिटात निघाला बेडूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2016 06:30 PM2016-09-28T18:30:34+5:302016-09-28T18:40:27+5:30
पोषण आहाराच्या शिऱ्याच्या बंद पाकिटमध्ये मृत बेडूक आढळून आल्याचा प्रकार तालुक्यातील धुमका येथे बुधवारी समोर आला.
ऑनलाइन लोकमत
देपूळ, दि. 28 - लहान मुलाला दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या शिऱ्याच्या बंद पाकिटमध्ये मृत बेडूक आढळून आल्याचा प्रकार तालुक्यातील धुमका येथे बुधवारी समोर आला. यासंदर्भात धुमका येथील इश्वर प्रल्हाद राठोड यांनी वाशिम पंचायत समितीकडे तक्रार नोंदविली आहे.
धुमका येथील अंगणवाडीत बोदीलाल गोपा राठोड यांच्या वेदिका नामक नातीला पोषण आहारांतर्गत शिऱ्याचे पॉकिट बुधवारी सकाळी ९ वाजता मिळाले होते. सदर पॉकिट उघडले असता, यामध्ये लहान आकाराचा मृत बेडूक आढळून आला. याप्रकरणी इश्वर प्रल्हाद राठोड यांनी वेदिकाचे आजोबा बोदिलाल राठोड, सरपंच छाया भगत, विजय भगत यांच्यासह वाशिम पंचायत समिती गाठली आणि येथे रितसर तक्रार नोंदविली.
सभापती गजानन भोने, उपसभापती मधुबाला चौधरी यांच्यासह पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. शिऱ्याच्या पॉकिटवर व्यंकटेश्वरा महिला औद्योगिक उत्पादन सहकारी संस्था लि. उदगिर असे नाव आहे. याप्रकरणी योग्य ती चौकशी केली जाईल, असे आश्वासन सभापती गजानन भोने यांनी दिले.