VIDEO: तब्बल 16 लाखांची सोनेरी गणेश मूर्ती

By admin | Published: August 30, 2016 05:03 PM2016-08-30T17:03:32+5:302016-08-30T17:13:36+5:30

पुण्यातील प्रसिद्ध रांका ज्वेलर्सने तर तब्बल 5.4 फूट म्हणजे एखाद्या माणसाच्या उंचीचीच सोनेरी गणेशमूर्ती तयार केली आहे

VIDEO: Ganapati idol of 16 lakh gold | VIDEO: तब्बल 16 लाखांची सोनेरी गणेश मूर्ती

VIDEO: तब्बल 16 लाखांची सोनेरी गणेश मूर्ती

Next
- ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 30 - गणशोत्सवानिमित्त सगळीकडेच उत्साह आहे. मुर्तीवर शेवटचा हात फिरवला जात आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळीदेखील वेगवेगळ्या मूर्ती पाहायला मिळत आहे. पुण्यातील प्रसिद्ध रांका ज्वेलर्सने तर तब्बल 5.4 फूट म्हणजे एखाद्या माणसाच्या उंचीचीच सोन्याचा मुलामा असलेली गणेशमूर्ती तयार केली आहे. 
 
ही देशातील सर्वात मोठी सोन्याची मूर्ती असल्याचा दावा केला जात आहे . शुद्ध सोन्यापासून बनवलेल्या मूर्तीचे दागिने आधुनिक लेजर कटिंगने तयार केले आहेत.  मुर्ती बनवण्यासाठी फ्युजन टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. आतील भागात वेगळा धातू आणि बाहेरून 24 केरेट सोन्याचा मुलामा आहे. एका गणेशभक्ताचे नवस पूर्ण झाल्याने त्यांच्या ऑर्डरनुसार पाच महिन्यांत मूर्ती पूर्ण करण्यात आली आहे. या सोन्याच्या मूर्तीची किंमत तब्बल 16 लाख 50 हजार आहे, अशी माहिती रांका ज्वेलर्सचे तेजपाल रांका यांनी दिली. याच रांका ज्वेलर्सने सव्वा कोटींचा सोन्याचा शर्ट बनविला होता.

Web Title: VIDEO: Ganapati idol of 16 lakh gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.