व्हिडीओ: गानसम्राज्ञी आशा भोसले महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

By admin | Published: April 25, 2016 09:43 AM2016-04-25T09:43:01+5:302016-04-25T09:44:57+5:30

चिरतरुण गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.

Video: Ganasamraniya Asha Bhosale honored with the Maharashtra Lifetime Achievement Award | व्हिडीओ: गानसम्राज्ञी आशा भोसले महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

व्हिडीओ: गानसम्राज्ञी आशा भोसले महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई - चिरतरुण गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. लोकमत समूहातर्फे पाच लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. मला अजून महाराष्ट्र सरकारने जीवनगौरव दिलेला नाही, पण लोकमतने दिलेला हा पुरस्कार मला त्याच तोलामोलाचा वाटतो असे सांगत आशाताईंनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिळाला हे भाग्य असे उद्गारही त्यांनी काढले.
आशाताईंना अर्पण करण्यात आलेले मानपत्र...
लोकमत-जीवन गौरव  आदरणीय आशा भोसले,    मा. दीनानाथांच्या फिरत्या गळ्य़ातून मिळालेलं शब्दांचे तेज आणि सुरांचं देणं ही आपल्याला लाभलेली जन्मदत्त देणगी रसिकांसाठी प्राजक्तासारखी प्रसन्नपणो अथक बरसत राहिली. आपलं मन:पूत बोलणं आणि उत्कट गाणं ही रसिकांच्या मर्मबंधातली ठेव बनली. अनेकानेक भाषाप्रभूंचे शब्द, त्याला कोंदण देणा:या स्वरांचं अनमोल धन आणि विलक्षण जिद्दी मन घेऊन पाश्र्वगायनाच्या क्षेत्रत आपण सहा दशकांहून जास्त काळ अधिराज्य गाजवले. वयाने सहस्रचंद्रदर्शनाचा टप्पा ओलांडल्यानंतरही रसिकांना मंत्रमुग्ध करण्याची आपली क्षमता तरूणच राहिली आहे. पहाटेपासून उत्तररात्रीर्पयतच्या प्रत्येक घटकेला तुमच्या मंतरलेल्या आवाजानं कोटय़वधी रसिकांना उभारी दिली. आपला आवाज काळाच्या ओघात संगीताच्या क्षेत्रत झालेल्या प्रत्येक बदलाला व्यापून दशांगुळे उरला. आयुष्याला चैतन्य देणाऱ्या आपल्या स्वराविष्काराच्या सदाबहार गंधात तीन पिढय़ा न्हाऊन निघाल्या. वैयक्तिक संकटांना शूराप्रमाणो सामोरे जाताना सुरांचा दरबार कायम चैतन्यदायी ठेवलात. चांद्यापासून बांद्यार्पयत पसरलेल्या शिवमंगल महाराष्ट्रभूमीला ललामभूत ठरलेले आपले कर्तृत्व वादातीत आणि प्रेरणादायी आहे. सौंदर्य, तारुण्य, मांगल्य, उत्साह, चैतन्य, जिद्द, धैर्य असं खूप काही सळसळत ठेवण्याची किमया आपल्या गात्या गळ्य़ाने लीलया साधली. आपल्या इंद्रधनुषी स्वरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप:यात आणि मनामनात पोहोचलेल्या लोकमतच्या तीन भाषांमधील अक्षरश: कोटी-कोटी वाचकांनी आपल्याला लोकमत जीवनगौरव’ पुरस्काराच्या रूपाने सलाम केला आहे. समर्थाच्या शब्दांत सांगायचे तर.. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हां कारणे ।। 

Web Title: Video: Ganasamraniya Asha Bhosale honored with the Maharashtra Lifetime Achievement Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.