VIDEO - पोळयाच्या दिवशी केली जाते गर्दभराजाची आंघोळ
By admin | Published: September 1, 2016 04:06 PM2016-09-01T16:06:07+5:302016-09-01T16:10:22+5:30
राज्यात आकोला जिल्ह्यातील आकोट शहरात रामटेकपुरा येथे पोळाचे दिवशी गर्दभराजाची आंघोळ करून घरासमोर पुजाअर्चा करण्यात येते.
Next
विजय शिंदे
ऑनलाइन लोकमत
आकोट, दि. १ - आकोला जिल्ह्यातील आकोट शहरात रामटेकपुरा येथे पोळाचे दिवशी गर्दभराजाची आंघोळ करून घरासमोर पुजाअर्चा करण्यात येते.त्याना रंगरंगोटी व सजविण्यात येते..अंगावर मखमली झुल टाकण्यात येते.हा उत्सव पाहण्याकरीता मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थीत असतात..वर्षभर कष्ट करणारा गर्दभराजा यादिवशी देखणा दिसतो. गत अनेक वर्षापासुन पोळा दिवशी हा उत्सव साजरा करीत असल्याचे प्रल्हाद चवरे, महादेव चवरे यांनी सांगितले.गाढव हे आमचे उदरनिर्वाहाचे साधन आहे.. पाठीवर ओझ वाहत वर्षभर राबतो..आजचा दिवस आम्ही गर्दभराजाची कृतज्ञता म्हणुन साजरा करत असल्याचे चांगदेव चवरे, प्रकाश कराळे यांनी सांगितले.