VIDEO - परिट समाजाच्यावतीने कपडे धुने आंदोलन!
By admin | Published: September 19, 2016 05:05 PM2016-09-19T17:05:57+5:302016-09-19T17:05:57+5:30
परिट समाजाच्यावतीने त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १९ सप्टेंबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिकत्मक पद्धतीने कपडे धुने आंदोलन करण्यात आले.
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १९ : परिट समाजाच्यावतीने त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १९ सप्टेंबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिकत्मक पद्धतीने कपडे धुने आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य परीट सेवा मंडळ आरक्षण कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही पाठविण्यात आले.
परीट समाज हा महाराष्ट्रामध्ये अंदाजे ३५ लाख लोकसंख्या असलेला समाज आहे. परंतु गेल्या ५५ वर्षापासून या समाजावर शासनाकडून अन्यायच होत आहे. डॉ. भांडे समितीच्या शिफारशीनुसार परिट (धोबी) समाजाला अनुसूचित जातीच्या प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य परीट सेवा मंडळ आरक्षण कृती समितीच्यावतीने करण्यात आली.या समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आतापर्र्यंत अनेक वेळा शासन दरबारी विविध प्रकारचे आंदोलन करण्यात आली व महाराष्ट्र राज्यातील १९६ आमदारांना ई मेल व्दारे निवेदनही पाठविले आहे.
समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी या विषयावर मुख्यमंत्र्यांसह बैठक घेऊन वरिल विषयांवर चर्चा करण्यासह परिट समाजाला सुविधा, आरक्षण तसेच अनेक समाजाचे विकासाबाबतचे निकाली काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले होते; परंतु त्याबाबत अद्याप कोणताच निर्णय वा चर्चा झाली नसून, ही बैठकही आयोजित करण्यात आली नाही. त्यामुळे समाजाच्या विविध समस्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी १९ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर समाजाच्यावतीने व अहिंसा मार्गाने कपडे धुणे, आंदोलन करण्यात आले.