VIDEO - कर्तृत्ववान महिलांचा सखी सन्मान पुरस्काराने गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2016 08:25 PM2016-11-05T20:25:50+5:302016-11-05T20:25:50+5:30
ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 5 - आपल्या सेवेतून मानवतेची ज्योत तेवत ठेवणा-या, सामान्य ते असामान्य असा प्रवास करणाºया जिल्ह्यातील ...
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 5 - आपल्या सेवेतून मानवतेची ज्योत तेवत ठेवणा-या, सामान्य ते असामान्य असा प्रवास करणाºया जिल्ह्यातील कर्तृत्वान स्त्रियांचा सन्मान ही खरे तर समाजीक जबाबदारीच आहे. ‘लोकमत’ ने या साठी पुढकार घेतला ही गौरवाची बाब असुन अशा सेवाव्रतींमुळे इतरांना प्ररेणा मिळते व या माध्यमातुन महिला सशक्तीकरण व सबलीकरणाचा मार्ग प्रशस्त होतो अशा शब्दात अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शनिवारी येथील हॉटेल तुषार एक्झेकटीव्हच्या सभागृहात आयोजित एका शानदार सोहळ्यात लोकमत सखी मंचच्या वतीने कर्तुत्वान महिलांचा ‘सखी सन्मान पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अकोल्याचे जिल्हाधिकारी बोलत होते. मंचावर महापौर उज्वलाताई देशमुख, लोकमतचे सहायक महाव्यवस्थापक रमेश डेडवाल, निवासी संपादक रवी टाले उपस्थित होते. यावेळी सामाजिक क्षेत्रासाठी झिंगुबाई बोलके आरोग्य विभागामधून डॉ.उज्ज्वला मापारी क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल महराष्टÑाच्या पहिल्या महिला कुस्ती वस्ताद सुनिता कडोळे व्यावसायीक क्षेत्रामधून बांधकाम व्यावसयीक निलाक्षी नाथ नरवाडे शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल वंदना नारे तर सांस्कृतिक-साहित्यिक क्षेत्रासाठी सीमा शेटे-रोठे यांना सखी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला तर हॉटेल तुषारच्या व्यवस्थापिका राखी हेमनाणी यांचा विशेष सन्मान करण्यात आला जिल्हाधिकारी म्हणाले की, महिलांचा सन्मान हा घरातुनच झाला पहिजे. आपल्या घरातील मुलांवर असे संस्कार झाले तर समाज वाईट प्रवृत्ती वाढणार नाही. महिला अबला नाहीत त्या सबलाच आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये एकाही महिलेचा समोवश नाही. संसाराचा डोलारा सांभाळतांना महिला अतिशय जिद्द व मेहनतीने यशाचे शिखर गाठत असते त्यामधील काही प्रातिनिधी महिलांचा सन्मान या ठिकाणी झाला ही बाब अतिशय गौरवाची आहे. महिलांच्या विकासासाठी विविध योजना आहेत त्यांच्यापर्यत पोहचवा, त्यांच्या लाभ त्यांनाच मिळेल या साठी प्रत्येकाने जागृत राहावे तसेच ग्रामिण भागातील शौचालय निर्मितीला गतिमान करण्याचाही संकल्प सर्वानी केला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. महापौर उज्ज्वलाताई देशमुख यांनी स्त्री भ्रुण हत्येचे वास्तवाची जाणीव करून देत महिलांनी या विरोधात आक्रमकपणे उभे राहिले पाहिजे असे आवाहन केले. महिलांचा सन्मान ही समाजामधील सकारात्मक बदलाचे चिन्ह असुन महिलांनीही अधिक जबाबदारी घेत आपली क्षमता सिद्ध केली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.