VIDEO : लोणार सरोवरात स्वच्छता अभियानात जर्मनीतील संशोधकांचा सहभाग

By admin | Published: September 27, 2016 02:23 PM2016-09-27T14:23:00+5:302016-09-27T14:47:08+5:30

लोणार येथील जागतिक स्तरावरील खा-या पाण्याच्या सरोवर परिसरात अनेक पर्यटक घाण करीत असल्यामुळे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

VIDEO: German researchers participate in cleanliness campaign in Lonar Sarovar | VIDEO : लोणार सरोवरात स्वच्छता अभियानात जर्मनीतील संशोधकांचा सहभाग

VIDEO : लोणार सरोवरात स्वच्छता अभियानात जर्मनीतील संशोधकांचा सहभाग

Next
मयूर गोेलेच्छा, ऑनलाइन लोकमत
लोणार (बुलडाणा), दि. २७ -  लोणार येथील जागतिक स्तरावरील खा-या पाण्याच्या सरोवर परिसरात  अनेक पर्यटक घाण करीत असल्यामुळे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात जर्मनीहून आलेले संशोधकही सहभागी झाले होते. लोणार येथे खारे पाणी असलेले जगातील दुस-या क्रमांकाचे सरोवर आहे. 
सरोवर पाहण्यासाठी तसेच याचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. सदर पर्यटक या ठिकाणी कचरा टाकतात. त्यामुळे हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानादरम्यान दरवर्षी १०० तास म्हणजेच आठवड्यातून दोन तास साफसफाई करणार असल्याची शपथ लोणारमधील नागरिकांनी घेतली. तसेच स्वत:हून या ठिकाणी घाण न करता सरोवराचे महत्व कायम ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची शपथ घेण्यात आली.
 
 

Web Title: VIDEO: German researchers participate in cleanliness campaign in Lonar Sarovar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.