VIDEO : तोंडाला पाणी आणणारी 'गिल्ली मिसळ'
By Admin | Published: November 4, 2016 12:29 PM2016-11-04T12:29:42+5:302016-11-04T14:08:42+5:30
ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 4 - तेजतर्रार... गर्द लाल रंगाची ही मिसळ पाहून तोंडाला पाणी सुटले ना... ही मिसळ ...
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 4 - तेजतर्रार... गर्द लाल रंगाची ही मिसळ पाहून तोंडाला पाणी सुटले ना... ही मिसळ आहे अकोल्यातील उगवा या छोट्याशा गावातील. गेल्या पन्नास वर्षांपासून खवय्यांमध्ये ही मिसळ 'गिल्ली मिसळ' म्हणून प्रसिद्ध आहे. शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या उगवा गावामध्ये सकाळी-सकाळी या मिसळचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी होते.
धीरज पटेल हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा तरुण या मिसळचे छोटेखानी फूड स्टॉल सध्या चालवत आहे. अकोलेकरांना या मिसळची चव मोठ्या प्रमाणात चाखता यावी, यासाठी धीरजने याचे फूड स्टॉल अकोला शहरातच सुरू केले आहे. सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत ही स्वादिष्ट मिसळ अकोलेकरांना खायला मिळते, त्यानंतर धीरज कॉलेजसाठी जातो.
{{{{dailymotion_video_id####x844gro}}}}
याचे वैशिष्ट्य म्हणजे मिसळसाठी लागणारा मसाला धीरज स्वतः घरीच बनवतो. त्यामुळे मिसळ आणि तर्रीची चव काही औरच असते. धीरजचे वडील बँकेमध्ये कर्मचारी असून आई गृहीण आहे. मात्र, सर्व पटेल कुटुंबच सध्या मिसळ बनवण्याच्या व्यवसायात गुंतले आहेत. केवळ सर्व सामान्य अकोलेकरच नाही तर येथील राजकारण्यांनाही 'गिल्ली मिसळ' खाण्याचा मोह आवरत नाही. अनेक जण तर मॉर्निंग वॉक केल्यानंतर उगव्याची ही गिल्ली मिसळ खाऊनच घरी जातात.