VIDEO: गोदावरीच्या पुराची पातळी वाढली, नाशिक शहरासह जिल्ह्यात हाय अलर्ट
By admin | Published: August 6, 2016 02:36 PM2016-08-06T14:36:52+5:302016-08-06T15:50:52+5:30
गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे अगोदरच नुकसान झालं असताना नदीची पुराची पातळी पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
नाशिक, दि. 6- गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे अगोदरच नुकसान झालं असताना नदीची पुराची पातळी पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. गंगापूर धरणाक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु झाल्याने गोदावरी नदीत होणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे गोदावरीच्या पुराची पातळी पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. परिणानी, दुतोंड्या मारुतीच्या डोक्यापर्यंत पाणी गेलं आहे. तसंच यशवंत मंदिराचा गाभारा पाण्यात गेला आहे.
अगोदरच पुरामुळे विस्कळी झालेलं जनजीवन अजून पुर्वपदावर आलेलं नाही. त्यातच आता पुराच्या पाण्याची पातळी पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. नाशिक शहारासह जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गंगापुर धरण - 83%
दुपारी 12 वाजून 10 मिनिटाला 3 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग
नदीपात्रात एकुण 15 हजार 618 क्युसेक पाणी
दर तासाला पाण्याची पातळी वाढत असल्याने विसर्ग सुरु राहणार
खालील प्रमाणे पाण्याचा विसर्ग केला जात आहे...
1) गंगापूर- 15618 क्यूसेक (गोदावरी नदीत)
2) दारणा-20179 क्युसेक (दारणा नदीत)
3) पालखेड - 21557 क्युसेक (कादवा नदीत)
4)कादवा- 5616 क्युसेक ( दारणा नदीत)
5) नाशिक शहरातील होळकर पूल ( nashik city, ramkund area )- 14190 क्युसेक
6) नांदूर मध्यमेश्वर विसर्ग 59748 क्युसेक