VIDEO : गोंदियात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले : दोन पायलट ठार

By Admin | Published: April 26, 2017 11:38 AM2017-04-26T11:38:11+5:302017-04-26T17:23:18+5:30

   विजेंद्र मेश्राम/हुपराज जमईवार/ऑनलाइन लोकमत  गोंदिया, दि. 26 -  गोंदियाजवळील बिरसी विमानतळावर असलेल्या राष्ट्रीय उड्डान प्रशिक्षण संस्थेचे (एनएफटीआय) प्रशिक्षणार्थी ...

VIDEO: Gondiya trainee plane collapses: two pilots killed | VIDEO : गोंदियात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले : दोन पायलट ठार

VIDEO : गोंदियात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले : दोन पायलट ठार

Next
 

 विजेंद्र मेश्राम/हुपराज जमईवार/ऑनलाइन लोकमत

 गोंदिया, दि. 26 -  गोंदियाजवळील बिरसी विमानतळावर असलेल्या राष्ट्रीय उड्डान प्रशिक्षण संस्थेचे (एनएफटीआय) प्रशिक्षणार्थी विमान बुधवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील वैनगंगा नदीत कोसळले. यात प्रशिक्षक व शिकाऊ पायलट तरुणी ठार झाले. 
मृतांमध्ये वरिष्ठ प्रशिक्षक रंजन गुप्ता (४५) आणि प्रशिक्षणार्थी पायलट हिमानी गुरूदाससिंह कल्याणी (२४) रा.दिल्ली यांचा समावेश आहे. सकाळी ९.२५ च्या सुमारास ह्यडीए-४२ नाईकह्ण या चार आसनी विमानाने बिरसी विमानळावरून उड्डान केल्यानंतर जवळपास ९.४० पर्यंत हे विमान बिरसी विमानतळावरील एअर ट्राफिक कंट्रोल (एटीसी) रुमच्या संपर्कात होते. परंतू त्यानंतर या विमानाचा संपर्क तुटला. विमान काही विशिष्ट पातळीपेक्षा कमी उंचीवर आल्यास एटीसीसोबत संपर्क तुटतो. त्यामुळे काही वेळात विमान पुन्हा संपर्कात येईल याची एटीसीमधील कर्मचारी वाट पाहात होते. पण १० मिनिटात संपर्क न झाल्यामुळे त्यांनी एनएफटीआय आणि बिरसी विमानतळाच्या संचालकांना माहिती दिली. 
विमानाच्या शेवटच्या लोकेशनवरून शोधाशोध केली असता हे विमान गोंदियापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या देवरी-लावणी या गावांजवळील वैनगंगा नदीच्या पात्रात कोसळल्याचे आढळले.
ज्या ठिकाणी हे विमान कोसळले त्या ठिकाणी नदीचे पात्र लहान आणि पाणीही कमी होते. पण विमान खाली कोसळताच त्याचे तुकडे झाले. त्यातच विमानातील दोन्ही पायलट दबल्या जाऊन घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

 रोप-वे च्या तारात अडकले

 प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान वैनगंगा नदीवरून अत्यंत खालच्या बाजुने उडत येत होते. यामुळे हे विमान वैनगंगा नदीच्या काठावरील दोन तिरांवर असलेल्या देवरी आणि लावणी गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटू नये म्हणून तयार केलेल्या ५० फूट उंचीवरील रोप-वे च्या ताराला स्पर्शुन गेले. यामुळे हे विमान अनियंत्रित होऊन नदीपात्रात कोसळले. विमान कोसळत असताना तिथे कपडे धुवत असलेल्या तीन महिलांपैकी इंतू चैनलाल मेश्राम (१९) ही तरुणी किरकोळ जखमी झाली.

घटनास्थळी एकच गर्दी
 विमान कोसळल्याची माहिती लगतच्या गावकऱ्यांना कळताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. दरम्यान बिरसी विमानतळाचे संचालक राजा रेड्डी यांच्यासह दवनीवाडा ठाण्याचे पोलीस, तिरोडा ठाण्याचे पोलीस तसेच मध्यप्रदेश पोलीसही घटनास्थळी पोहोचले. गर्दीला आवरण्यासाठी गोंदियावरून शिघ्र कृती दलाला पाचारण करण्यात आले. दिवसभर गोंदिया जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील लोकांची कोसळलेले विमान पाहण्यासाठी गर्दी कायम होती.

 
दिल्लीचे चौकशी पथक रवाना
या छोट्या विमानात ब्लॅक बॉक्स नसतो. त्यामुळे विमान अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी दिल्लीवरून तंत्रज्ञांना बोलविले आहे. ते येऊन तपासणी करेपर्यंत विमानाचे अवशेष नदीतून हलविता येणार नाही.
- राजा रेड्डी

   
https://www.dailymotion.com/video/x844w7d

Web Title: VIDEO: Gondiya trainee plane collapses: two pilots killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.