VIDEO- संताजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त निघाली भव्य शोभायात्रा

By Admin | Published: December 27, 2016 06:28 PM2016-12-27T18:28:28+5:302016-12-27T18:28:28+5:30

ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 27 - संताजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाच्या वतीने मंगळवार, २७ डिसेंबर रोजी शहरात ...

VIDEO - The grand ceremony of Santaji Maharaj's death anniversary | VIDEO- संताजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त निघाली भव्य शोभायात्रा

VIDEO- संताजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त निघाली भव्य शोभायात्रा

Next

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 27 - संताजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाच्या वतीने मंगळवार, २७ डिसेंबर रोजी शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वरला सकाळी १0 वाजता दुग्धाभिषेक केल्यानंतर शोभायात्रेला प्रारंभ झाला. शोभायात्रेच्या अग्रभागी घोडे, उंट आणि संताजी महाराजांची मूर्ती असलेला रथ चालत होता. जयहिंद चौक, सिटी कोतवाली, गांधी चौक, मनपा चौक, मदनलाल धिंग्राचौक होत ही शोभायात्रा स्वराज्य भवनात पोहोचली. याठिकाणी आभार प्रदर्शन व राष्ट्रगीताने शोभायात्रेचा समारोप झाला.
प्रदेश उपाध्यक्ष विष्णू मेहरे व जिल्हाध्यक्ष दीपक ईचे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या संताजी महाराज शोभायात्रेत जिल्हा सचिव दिलीप गुल्हाने, जिल्हा संपर्क प्रमुख पुरुषोत्तम जामोदे, जिल्हा संघटक दिलीप वानखडे, जगन्नाथ भोलाने, उपाध्यक्ष सुनील लगड, दिलीप भगत, बबनराव असलमोल, डॉ. धनंजय नालट यांच्यासह सर्व प्रांतिक तेली समाज बांधव बहुसंख्येने शोभायात्रेत सहभागी झाले होते. विविध सेवाभावी संघटनांच्या वतीने शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

https://www.dailymotion.com/video/x844mod

Web Title: VIDEO - The grand ceremony of Santaji Maharaj's death anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.