VIDEO : अकोल्यातील तुळजाभवानी मंदिरासमोर साकारणार भव्य प्रवेशद्वार

By Admin | Published: September 30, 2016 12:58 PM2016-09-30T12:58:35+5:302016-09-30T13:01:10+5:30

अनिकट परिसरातील आई तुळजा भवानी आसरा माता मंदिरासमोर १८ फूट उंच व १३ फूट रूंद प्रवेशद्वार साकारण्यात येत आहे.

VIDEO: A grand entrance to the Tuljabhavani temple in Akola | VIDEO : अकोल्यातील तुळजाभवानी मंदिरासमोर साकारणार भव्य प्रवेशद्वार

VIDEO : अकोल्यातील तुळजाभवानी मंदिरासमोर साकारणार भव्य प्रवेशद्वार

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. ३० -  अनिकट परिसरातील आई तुळजा भवानी आसरा माता मंदिरासमोर १८ फूट उंच व १३ फूट रूंद प्रवेशद्वार साकारण्यात येत आहे. सिंहाचा भव्य मुखवटा असे या प्रवेशद्वाराचे स्वरूप राहील. नवरात्रोत्सव संपताच या भव्य प्रवेशद्वाराच्या निर्मितीस प्रारंभ होणार असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त शंकर केशव गेडाम यांनी दिली. मजबूत प्रवेशद्वाराच्या निर्मितीसाठी लोखंडी गज व सिमेंट काँक्रिट वापरले जाणार असून, त्याच्या उभारणीकरिता २.५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत मंदिराला देणगीस्वरूपात प्राप्त झालेल्या निधीतून हा निधी खर्च करण्यात येणार असल्याचे गेडाम यांनी सांगितले. तुळजा भवानी मातेच्या दर्शनाकरिता येणाºया भाविकांना सिंहाच्या मुखातून प्रवेश करावा लागणार असल्याने हे मंदिर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आबालवृद्धांकरिता आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल; तसेच अकोल्याच्या धार्मिक इतिहासात आणखी भर पडेल, अशा प्रतिक्रिया भाविकांनी ‘लोकमत’ला दिल्या.
 
 

Web Title: VIDEO: A grand entrance to the Tuljabhavani temple in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.