VIDEO : शाही मिरवणुकीने ललिताचे साता-यात शानदार स्वागत

By admin | Published: August 25, 2016 12:44 PM2016-08-25T12:44:13+5:302016-08-25T13:14:47+5:30

रिओ आॅलिम्पिकमध्ये ३ हजार मीटर स्टीपलचेस क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करणारी, ' अर्जुन' पुरस्कार विजेती ललिता बाबरचे साता-यात शानदार स्वागत करण्यात आले.

VIDEO: A grand welcome in the royal procession of Lalita | VIDEO : शाही मिरवणुकीने ललिताचे साता-यात शानदार स्वागत

VIDEO : शाही मिरवणुकीने ललिताचे साता-यात शानदार स्वागत

Next

आॅनलाईन लोकमत

सातारा, दि. २५ -  रिओ आॅलिम्पिकमध्ये ३ हजार मीटर स्टीपलचेस क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करणारी, ' अर्जुन' पुरस्कार विजेती ललिता बाबरचे साता-यात शानदार स्वागत करण्यात आले. माण तालुक्यातील मोहीची कन्या, ‘सातारा एक्स्प्रेस’ ललिताचे जिल्ह्यात गुरूवारी उत्साहात स्वागत करण्यात आले. सातारा शहरातून तिची शाही मिरवणूक काढण्यात आली.

 

आॅलिम्पिक स्पर्धेत तीन हजार मीटर स्टीपल चेस क्रीडा प्रकारात अंतीम फेरी गाठणाºया ललिता बाबर हिचे शानदार स्वागत करण्यासाठी संपूर्ण जिल्हा आतूर झाला होता. जिल्ह्याची वेस असलेल्या शिरवळमध्ये तिचे  स्वागत करण्यात आले.  फुले आणि तिरंगी फुग्यांनी सजविलेल्या जिप्सीमधून मिरवणूक काढण्यात आली. साताºयातील गांधी मैदानापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. ही मिरवणूक राजपथावरुन कमानी हौद, तेथून शेटे चौकमार्गे पोवई नाक्यावर आली. पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन  अभिवादन केले. यावेळी आमदार जयकुमार गोरे, आमदार प्रभाकर घार्गे उपस्थित होते. 

मिरवणुकीत सहभागी झालेल्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. चौकाचौकात ढोल, ताशा, झांज अन् लेझीमचे खेळ करण्यात आले. 

Web Title: VIDEO: A grand welcome in the royal procession of Lalita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.