VIDEO : डोंबिवलीत भरली आजी-आजोबांची 'शाळा'
By Admin | Published: January 13, 2017 11:56 AM2017-01-13T11:56:50+5:302017-01-13T13:55:20+5:30
ऑनलाइन लोकमत डोंबिवली, दि. १३ - 'म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण' असं म्हणतात. हीच उक्ती खरी ठरवत सांस्कृतिक नगरी डोंबिवलीत ...
ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. १३ - 'म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण' असं म्हणतात. हीच उक्ती खरी ठरवत सांस्कृतिक नगरी डोंबिवलीत दरवर्षी आजी-आजोबा संमेलन भरतं. डोंबिवलीतील विद्या निकेतन शाळेत गेल्या २२ वर्षांपासून हे ' आजी-आजोबा' संमेलन भरत असून राज्यातील विविध ठिकाणाहून वृद्ध नागरिक यामध्ये सहभागी होतात.
स्नेहसंमेल किंवा मीटिगनिमित्त विद्यार्थ्यांचे पालक नेहमीच शाळेत येतात, मात्र आजी-आजोबांनाही आपल्या नातवंडांच्या शाळेचे आकर्षण असते, हीच गोष्ट ध्यानात ठेऊन शाळेतर्फे दरवर्षी हे संमेलन भरवले जाते. त्या थोडा काळासाठी सर्वजण आपली दुखणी -खुपणी, विवंचना बाजूला ठेऊन मज्जा करतात, जुन्या आठवणींना उजाळा देत पोटभर गप्पाही मारतात. यावर्षीही शाळेत हे संमेलन भरले असून विविध शहरातून एकूण ८५५ आजी-आजोबा संमेलनात सहभागी झाले आहेत. त्यांनी गप्पांसोबतच खेळही खेळले आणि गाण्याच्या कार्यक्रमाचाही आनंद घेतला.
https://www.dailymotion.com/video/x844oc4