VIDEO : नांदेड शहरात आज पहिल्यांदाच ग्रीन कॉरिडॉर

By admin | Published: October 19, 2016 12:53 PM2016-10-19T12:53:28+5:302016-10-19T15:59:54+5:30

नांदेडमध्ये आज प्रथमच ग्रीन कॉरिडॉर होणार असून दुचाकीच्या अपघातात जखमी पडलेल्या तरूणाचे अवयवदान करण्यात येणार आहे.

VIDEO: Green Corridor for the first time in the city of Nanded | VIDEO : नांदेड शहरात आज पहिल्यांदाच ग्रीन कॉरिडॉर

VIDEO : नांदेड शहरात आज पहिल्यांदाच ग्रीन कॉरिडॉर

Next
ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. १९ - नांदेडमध्ये आज प्रथमच ग्रीन कॉरिडॉर होणार असून दुचाकीच्या अपघातात जखमी पडलेल्या तरूणाचे अवयवदान करण्यात येणार आहे. 
सुधीर रावळकर हा 35 वर्षीय तरुण दुचाकीच्या अपघात गंभीर जखमी झाला व त्याचा मेंदू मृतावस्थेत ( ब्रेन डेड) गेला. त्यामुळे त्याच्या परिवाराने अवयावदानाचा निर्णय घेतला असून नांदेडच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात त्याचे ४ अवयव काढण्यात आले. मुंबईतील फोर्टिस रुग्णालय हृदय, पुण्यातील रुबी रुग्णालयात लिव्हर, औरंगाबादमध्ये किडनी व नांदेडमधील रुग्णालयातच डोळे पाठवण्यात येणार आहेत.  
सुधीर रावळकर हा २००८ सालापासून  मुखेड तालुक्यात रोहयो योजनेत सहायक कार्यक्रम अधिकारी म्हणून  कंत्राटी पद्धतीने कार्यरत होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी आणि 6 वर्षांची मुलगी आहे.
 
ग्रीन कॉरीडोर म्हणजे काय??? 
रुग्णाचा मेंदू मृतावस्थेत गेल्यावर नातेवाईकानी अवयव दानाचा निर्णय घेतल्यास विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीशी संपर्क साधला जातो. त्यानंतर प्रतिक्षा यादीत असलेल्या रुग्णांशी संपर्क साधला जातो. प्रतिक्षा यादीतील रुग्ण दुसऱ्या रुग्णालयात अथवा शहरात असेल तर त्यावेळी कमीत कमी वेळात आणि जलद गतीने दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी ग्रीन कॉरीडोर आखला जातो. यावेळी पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस यांच्या मदतीने ग्रीन कॉरिडॉर आखला जातो. ग्रीन कॉरीडोर म्हणजे रुग्णवाहिका कोणत्या रस्त्याने जाणार आहे हे ठरवण्यात येते. त्यानंतर रस्त्यावरील ती लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात येते. वाहतूक दुसऱ्या बाजूने सुरु असते. पण रुग्णवाहिका जात असताना गाड्या थांबवल्या जातात. एका राज्यातून अथवा शहरातून, जिल्ह्यातून अवयव दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी विमानाचाही वापर केला जातो. तेव्हा अवकाशात ही अशाच पद्धतीने ग्रीन कॉरीडोर आखला जातो.

Web Title: VIDEO: Green Corridor for the first time in the city of Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.