VIDEO - रक्तदान यज्ञाद्वारे शहीद सैनिकांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2016 08:49 PM2016-10-19T20:49:25+5:302016-10-19T20:49:25+5:30
उरी येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशभर शहीद सैनिकांना अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात आले असतानाच खामगाव शहरात मात्र रक्तदान
Next
>ऑनलाइन लोकमत
खामगाव, (जि.बुलडाणा), दि.19 - उरी येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशभर शहीद सैनिकांना अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात आले असतानाच खामगाव शहरात मात्र रक्तदान यज्ञाचे आयोजन करून शहीद सैनिकांना अभिवादन करण्यात आले. या शिबिरात महिलांनीही उत्स्फूर्तपणे रक्तदान करून देशभक्तांप्रती आपल्या सद्भावना व्यक्त केल्या.
शहरातील सतीफैल भागात जय जगदंबा उत्सव मंडळाच्यावतीने कोजागिरी पौर्णिमेपासून जगदंबा उत्सव साजरा होत आहे. या उत्सवाचे औचित्य साधून दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना अभिवादन करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन १९ आॅक्टोबर रोजी करण्यात आले होते. या शिबिराचे प्रारंभी शहीद जवानांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर या शिबिरात अलकाबाई वायचळ, वंदनाताई पाल, संगीताताई महाडीक, माधुरीताई व्यवहारे, पुजा पाल, कन्हैया यादव, नितीन बिडकर, नरेश व्यवहारे, सोनु तिवारी, राकेश तिवारी, प्रमोद इंडोले, चेतन तायडे, लक्ष्मण मोरे, संतोष भोकरे, अंकुश पाठक, आकाश धुरंदे, विक्रम घोडेचोर, सतिष यादव, पवन पाठक, सचिन वायचळ, प्रशांत बिडकर, नरेश हिवरखेडे, किशोर बोर्डे, निलेश बिडकर, अस्लम चौधरी सिध्दांत गरड, अमोल बिडकर, अभय बुंदेले, दिपक पानकर, वैभव किर्तनकार, अतुल सावडेकर, पवन घाडगे, निरज हट्टेल अशा ३१ जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. विशेष म्हणजे महिला सुध्दा रक्तदान करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे आल्या. दरवर्षी या मंडळाकडून जगदंबा उत्सवाचे औचित्य साधून धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येत असतात. यावर्षीही मंडळांच्यावतीने सामाजिक गरज पाहता स्त्रीभू्रण हत्या रोखण्यासाठी जनजागृती केल्या जात आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जय जगदंबा मंडळाचे पदाधीकारी व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.