VIDEO : वाघाचा रस्ता अडविणाऱ्या जिप्सीचालकांसह गाईडवर निलंबनाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 04:53 PM2021-01-30T16:53:50+5:302021-01-30T16:57:26+5:30

Yavatmal : २८ जानेवारीला तीन वेगवेगळ्या जिप्सींनी पर्यटकांना सोबत घेऊन टिपेश्वर अभयारण्यात प्रवेश केला. 

VIDEO: Guide suspended with gypsy driver blocking the tiger's path | VIDEO : वाघाचा रस्ता अडविणाऱ्या जिप्सीचालकांसह गाईडवर निलंबनाची कारवाई

VIDEO : वाघाचा रस्ता अडविणाऱ्या जिप्सीचालकांसह गाईडवर निलंबनाची कारवाई

googlenewsNext

पांढरकवडा (यवतमाळ) : टिपेश्वर अभयारण्यातील पर्यटनादरम्यानचे नियम पायदळी तुडविणाऱ्या व समोरून येणाऱ्या वाघाचा रस्ता अडवून धरणाऱ्या तीन जिप्सी, त्यावरील चालक व गाईड यांना विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) सुभाष पुराणिक यांनी तडकाफडकी निलंबित केले. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. २८ जानेवारीला तीन वेगवेगळ्या जिप्सींनी पर्यटकांना सोबत घेऊन टिपेश्वर अभयारण्यात प्रवेश केला. 

यादरम्यान, जिप्सी क्रमांक एम.एच.१२-क्यू.एफ ६३७३ चा चालक किरण मडावी व गाईड सागर एंबडवार यांनी त्यांच्यापुढे एक जिप्सी उभी असताना ५० मीटर अंतराची मर्यादा ओलांडून त्या जिप्सीच्या अगदी जवळ आपले वाहन उभे केले. त्यामुळे तेथे असलेल्या वाघाचा रस्ता अडवून धरला. एवढेच नव्हे तर निर्धारीत रस्ता सोडून बाजूला जंगलात वाहन नेले. तेथे वाघ उभा असल्यामुळे तेथून आपले वाहन पुढे नेण्याऐवजी त्याच ठिकाणी थांबवून ठेवले. त्यानंतर एम.एच.१८-एफ.००६३ क्रमांकाच्या जिप्सीचा चालक संदीप मेश्राम व गाईड मन्सूर शेख यांनी त्यांच्या जिप्सीसमोर उभा असलेला वाघ तेथून निघून गेल्यानंतरही आपले वाहन पुढे नेले नाही. 

यासोबतच जिप्सी क्रमांक एम.एच.४०-बी.जे.६१६९ चा चालक गजानन बुर्रेवार व गाईड नागेश्वर मेश्राम यांनी समोर वाघ दिसत असतानाही आपले वाहन ५० मीटरपेक्षा कमी अंतराजवळ नेले. ही बाब एका व्हायरल व्हिडीओमधून पुढे आली. त्यावरून विभागीय वनअधिकारी सुभाष पुराणिक यांनी तिनही जिप्सीवरील चालक व गाईड यांना निलंबित केले. यातील एका जिप्सीचा चालक किरण मडावी व गाईड सागर एंबडवार या दोघांना जिप्सीसह २८ फेब्रुवारीपर्यंत निलंबित करण्यात आले. तर उर्वरित दोन जिप्सींवरील चालक व गाईडला १४ फेब्रुवारीपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.



 

Web Title: VIDEO: Guide suspended with gypsy driver blocking the tiger's path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.