VIDEO - त-हाळा येथील ऐतिहासिक दर्गा

By admin | Published: October 18, 2016 06:53 PM2016-10-18T18:53:02+5:302016-10-18T18:53:02+5:30

जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात मुस्लिम धर्मियांचे पवित्र धार्मिक स्थळ म्हणून ओळख असलेला हजरत बाबाजान यांचा दर्गा आहे.

VIDEO - Historical Dargah at Tala-hala | VIDEO - त-हाळा येथील ऐतिहासिक दर्गा

VIDEO - त-हाळा येथील ऐतिहासिक दर्गा

Next
>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि.18 - जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात मुस्लिम धर्मियांचे पवित्र धार्मिक स्थळ म्हणून ओळख असलेला हजरत बाबाजान यांचा दर्गा आहे. हा दर्गा जगप्रसिद्ध असून, या ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या सर्वच पवित्र सणांदरम्यान विदेशातूनही मुस्लिम भाविक नेहमी येत असतात. या ठिकाणी अफगाणिस्तान आणि इतर मुस्लिम देशातून वर्षभर मुस्लिम यात्रेकरूंच्या वाºया सुरूच असतात. जगातील काही निवडक दर्गामध्ये विशेषकरून मुस्लिम पठाण वर्गासाठी हा दर्गा जगातील एक प्रसिद्ध आणि अतिशय महत्त्वाचे धार्मिक स्थळ  आहे. या दर्गामध्ये मुस्लिम बांधवांसाठी आवश्यक त्या सर्वच सुविधा उपलब्ध आहेत. शहंशाह कलंदर सैय्यद अकबर अलीशाह उर्फ बाबाजान यांचा हा  दर्गा असून, मुघल काळात जवळपास चारशे वर्षांपूर्वी याची स्थापना झाली आहे. स्वत: बाबाजान यांनीच अफगाणिस्थान येथून त-हाळा येथे स्थायिक होत. या दर्गाची स्थापना केल्याची माहिती मुस्लिम बांधव देतात. या दर्गामध्ये भाविकांसाठी महिन्यांतून दोन वेळा महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात येते. त्याशिवाय येथे येणा-या मुस्लिम भाविकांसाठी रोज जेवणाची आणि राहण्याची सर्व व्यवस्था केली जाते. 

Web Title: VIDEO - Historical Dargah at Tala-hala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.