VIDEO : अकोल्यात शेत नांगरताना सापडली होती श्रीकृष्णाची मूर्ती
By admin | Published: August 23, 2016 11:56 AM2016-08-23T11:56:02+5:302016-08-23T12:32:18+5:30
गोकुळाष्टममीनिमित्त जाणून घेऊया अकोल्यातील श्रीकृष्ण मंदिराबद्द्ल. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे माना गावात शेत नांगरतांना ही मूर्ती सापडली असून अदभूत कलाकृर्ती म्हणून या मुर्तीचे विशेष स्थान आहे.
राजेश शेगोकार
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २३ - गोकुळाष्टमी म्हणजे सर्वांच्या लाडक्या श्रीकृष्णाचा सण. रात्री श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करुन दुस-या दिवशी दहीहंडी खेळली जाते. यानिमित्ताने अनेकजण श्रीकृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घेणं पसंत करतात. यानिमित्ताने जाणून घेऊया अकोल्यातील श्रीकृष्ण मंदिराबद्द्ल. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे माना गावात शेत नांगरतांना ही मूर्ती सापडली असून अदभूत कलाकृर्ती म्हणून या मुर्तीचे विशेष स्थान आहे.
माना गावात श्रीराम व श्रीकृष्ण यांचे एकत्रीत मंदिर आहे. गावखेडयात दिसणा-या मंदिराप्रमाणेच या मंदिराचे बाह्यरूप आहे मात्र आतमध्ये प्रवेश केल्यानंतर या दोन्ही मुर्ती पाहिल्यावर अक्षरक्ष: डोळे दिपून जातात. काळया पाषाणातील या दोन्ही मुर्ती इतक्या रेखीव आहेत की जणु काही काही क्षणातच त्या हालचाल करू लागतील असा भास कुणालाही होणे सहाजीक आहे. या दोन्हीमुर्ती मध्ये साम्य म्हणजे माना गावात शेत नांगरतांना या दोन्ही मुर्ती सापडल्या असुन अदभूत कलाकृर्ती म्हणून या मुर्तीचे स्थान आहे. गोकुळाष्टमी निमित्ताने या मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी जमते