व्हिडीयो - विमान समुद्रात कोसळलं तर...

By Admin | Published: May 4, 2016 01:15 PM2016-05-04T13:15:30+5:302016-05-04T14:08:00+5:30

समजा विमान समुद्रात कोसळलं, किंवा एखादं जहाज बुडालं तर प्रवाशांचं काय ही भीती आपल्या मनात आधी येतो

Video - If the plane collapses in the sea ... | व्हिडीयो - विमान समुद्रात कोसळलं तर...

व्हिडीयो - विमान समुद्रात कोसळलं तर...

googlenewsNext
>मुंबई : समजा विमान समुद्रात कोसळलं, किंवा एखादं जहाज बुडालं तर प्रवाशांचं काय ही भीती आपल्या मनात आधी येतो. चारी बाजुंनी समुद्र असताना जीव कसा वाचवणार हा प्रश्न विमानातल्या किंवा जहाजावरच्या प्रवाशांसाठी महत्त्वाचा असतो. अशावेळी कस लागतो तो तटरक्षक दलाचा.
तटरक्षक दलाचे जवान हेलीकॉप्टर व बोटींच्या सहाय्याने दुर्घटनाग्रस्त विमानातल्या वा बोटीतल्या प्रवाशांच्या सहाय्यासाठी धावून जातं. वेगवेगळ्या युक्त्या व तंत्रज्ञानाचा वापर करत तटरक्षक दलाचे जवान प्रवाशांचा जीव वाचवतात, त्यांना सुखरूप किनाऱ्याला आणतात.
मंगळवारी तटरक्षक दलांनी हेलीकॉप्टर्स व जहाज यांच्या सहाय्याने हे काम कसं पार पाडलं जातं याचं प्रात्यक्षिक मुंबईलगतच्या समुद्रात दाखवलं.
 
(व्हिडीयो व छायाचित्रे - सुशील कदम)
 
समुद्री सुरक्षा, तसेच शोध व बचावकार्यात सातत्य व सुधारणा राखण्यासाठी भारतीय तटरक्षक दलातर्फे मंगळवारी मुंबई जवळच्या समुद्रात करण्यात आलेल्या कवायतीत मुंबई महापालिकेनेही सहभाग घेतला.
राष्ट्रीय सामुद्रिक शोध आणि बचाव कवायत-२0१६ अंतर्गत मंगळवारी तटरक्षक दलातर्फे मुंबई नजीकच्या समुद्रात ही कवायत पार पडली. त्यात विमान बेपत्ता झाल्यास तटरक्षक दलाच्या नौका, नौदलाच्या नौका, विमाने, हेलिकॉप्टर यांनी शोध व बचावकार्य राबवले.
 
 
समुद्रातून शोध आणि बचाव कार्यामध्ये रंगीत तालमीचा एक भाग म्हणून अपघातग्रस्त व्यक्तींना मुंबईत ससून डॉक, मुंबई पोर्ट ट्रस्टचा धक्का, गिरगाव चौपाटी, तसेच महालक्ष्मी रेसकोर्स येथे आणण्यात आले. या ठिकाणाहून अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेण्यासाठी मुंबई महापालिकेचे आरोग्य प्रशासन, खासगी रुग्णालये, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा, मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस यांच्या समन्वयाने रंगीत तालीम करण्यात आली. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका यांची मदत त्याकरिता घेण्यात आली.
 
 
प्रत्यक्षात अशा घटना उद्भवल्यास सर्व संबंधित यंत्रणांना करावे लागणारे कार्य, संभाव्य अडचणी, त्यावर करावयाच्या उपाययोजना यांचा अभ्यास व्हावा आणि समन्वयातून आपत्कालीन बचावकार्य सक्षम व्हावीत, या हेतूने ही कवायत आयोजित करण्यात आली होती.

Web Title: Video - If the plane collapses in the sea ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.