VIDEO- वाहनांची संख्या वाढल्याने द्रुतगती महामार्ग बनला कासवगती
By Admin | Published: April 30, 2017 01:01 PM2017-04-30T13:01:47+5:302017-04-30T15:11:20+5:30
ऑनलाइन लोकमत लोणावळा, दि. 30 - उन्हाळी सुट्टया आणि प्राईम विकेंडच्या शनिवार, रविवार व सोमवारच्या सलग सुट्टयांमुळे मोठ्या संख्येने ...
ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 30 - उन्हाळी सुट्टया आणि प्राईम विकेंडच्या शनिवार, रविवार व सोमवारच्या सलग सुट्टयांमुळे मोठ्या संख्येने मुंबईकर पर्यटक थंड हवेची ठिकाणे असलेल्या लोणावळा, महाबळेश्वर तसेच कोल्हापूर परिसरात जाण्यासाठी वाहनांनी घराबाहेर पडल्याने मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा वाहनांच्या संख्येपुढे कमी झाला आहे.
वाहनांची प्रचंडी गर्दी वाढल्याने आज भल्या पहाटे पासून द्रुतगतीवर पुण्याच्या दिशेने जाणार्या मार्गावर वाहनांच्या तब्बल सहा ते सात किमी अंतरापर्यत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अतिशय संथ गतीने वाहतुक सुरु असल्याने दिवसभर हा मार्ग संथच राहिल अशी शक्यता आहे. द्रुतगती मार्गावर खालापुर टोलनाका ते अमृतांजन पुल दरम्यान ही वाहतूक कोंडी झाली आहे. शनिवारी देखील दिवसभर द्रुतगतीवर हीच स्थिती होती.
सलग सुट्टयांमुळे पर्यटनाचा बेत आखून कुटुंबीयांसमवेत घराबाहेर पडलेल्या हजारों पर्यटकांना आजचा दिवस या वाहतूक कोंडीतच घालवावा लागला. बोरघाट व खंडाळा महामार्ग पोलीस तसेच आयआरबीचे क्रेन पथक हे द्रुतगतीवर वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घेत असले तरी वाहनांच्या संख्येपुढी ही यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते.