VIDEO - 'जय भिम' निनादाने अकोला शहर दणाणले

By admin | Published: October 12, 2016 08:07 PM2016-10-12T20:07:49+5:302016-10-12T20:07:49+5:30

अश्वांवर स्वार झालेले भिमसैनिक, नीळ्या रंगाचे फेटे परिधान केलेले युवक, हातामध्ये पचंशील ध्वज आणि ढोलताशांचा निनाद, जय भिमचा जयघोष अशा उत्साहपूर्ण

VIDEO - 'Jai Bhim', Nineadan carved the city of Akola | VIDEO - 'जय भिम' निनादाने अकोला शहर दणाणले

VIDEO - 'जय भिम' निनादाने अकोला शहर दणाणले

Next
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 12 - अश्वांवर स्वार झालेले भिमसैनिक, नीळ्या रंगाचे फेटे परिधान केलेले युवक, हातामध्ये पचंशील ध्वज आणि  ढोलताशांचा निनाद, जय भिमचा जयघोष अशा उत्साहपूर्ण वातावरणात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवारी दुपारी शहरातून जल्लोषात मिरवणूक काढली. 
दुपारी ३ वाजता रेल्वे स्टेशन चौक परिसरातून धम्मचक्र प्रवर्तन दिन मिरवणूकीला सुरूवात झाली. मिरवणूकीच्या प्रारंभी अश्वांवर स्वार झालेले समता सैनिक दलाचे सदस्य होते. पंचशील ध्वज हातात घेऊन जय भिमच्या घोषासह मिरवणूक पुढे निघाली. मिरवणूकीमध्ये जिल्हाभरातून आंबेडकर अनुयायी असलेले युवक, युवती, महिला बहुसंख्येने सहभागी झाले होते. मिरवणूकीमध्ये सहभागी झालेल्या आखाडा व व्यायाम शाळेचे सदस्य लाठीकाठी, चक्र, तलवारबाजी, मल्लखांबसारखे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करीत होते. प्रात्यक्षिक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुर्तफा नागरिकांनी गर्दी केली होती.  युवक, युवती हातात लेझिम घेऊन मिरवणूकीसमोर नृत्याचा फेर धरीत होत्या. हातात निळे ध्वज हातात घेवून भिमसैनिक पुढे सरकत होते. रेल्वे स्थानक, रेल्वे, शिवाजी पार्क, होमिओपॅथी महाविद्यालय चौक, मनकर्णा प्लॉट चौक, शहीद अब्दुल हमीद चौक, रिगल टॉकिज मार्गावर ठिकठिकाणी भिमसैनिकांच्या स्वागतासाठी स्टॉल उभारण्यात आले होते. मिरवणूकीत सहभागी झालेल्या भिमसैनिकांना सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने मसालाभात, पोहे, पुरीभाजीचे वितरण करण्यात आले. मिरवणूक मार्गावरील चौकाचौकांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा आणि पुतळे उभारण्यात आले होते. या दोन्ही महामानवांच्या प्रतिमा, पुतळ्यांसमोर आकर्षक सजावट करण्यात आली होती. मिरवणूक उदय टॉकिजजवळ पोहोल्यावर सायंकाळी भारिप बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, कार्याध्यक्ष काशीराम साबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे आदी नेते सजविलेल्या रथावर विराजमान झाली. याठिकाणाहून मिरवणूक अकोला क्रिकेट क्लब मैदानावर पोहोचली.
 

Web Title: VIDEO - 'Jai Bhim', Nineadan carved the city of Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.