VIDEO - जयगड-मुंबई, राजापूर-मुंबई एसटी बससह किमान 22 प्रवासी बेपत्ता
By admin | Published: August 3, 2016 09:07 AM2016-08-03T09:07:11+5:302016-08-03T18:56:21+5:30
मुसळधार पावसामध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानचा सावित्री नदीवरचा जुना पुल वाहून गेला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - मुसळधार पावसामध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानचा सावित्री नदीवरचा जुना पुल वाहून गेला आहे. या दुर्घटनेत त्यावेळी पूलावर असणा-या दोन एसटी बसेस आणि काही छोटी वाहनेही वाहून गेली आहेत. अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले असून उद्या सकाळी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
जयगडहून मुंबईला येणारी एमएच - २० - बीएल 1538 आणि राजापूरहून बोरीवली येणारी एमएच - ४० - एन ९७३९ या दोन बसेस वाहून गेल्या आहेत. या दोन्ही बसमध्ये चालक-वाहकासह मिळून एकूण २२ प्रवासी होते.
जयगड-मुंबई आणि राजापुर-मुंबई या दोन बसेसची नोंद पोलादपुर एसटी स्थानकातून पुढे रवाना अशी आहे; मात्र या दोन्ही बसेस अद्याप महाड बस स्थानकात पोहोचलेल्या नाहीत.
पुण्या-मुंबईतून एनडीआरएफच्या दोन टीम्स घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. प्रत्येक टीममध्ये ४० जवान आहेत. एनडीआरएफ शोधकार्यासाठी सहा बोटींचा वापर करणार आहे. या घटनेचे गांर्भीय लक्षात घेऊन नौदल आणि वायूदलाची मदत घेण्यात येणार आहे. हॅलिकॉप्टर्सच्या मदतीने शोध कार्य करण्यात येणार आहे.
राजापूर-बोरिवली आणि जयगड - मुंबई या एसटी बसमधील प्रवाशांच्या नातेवाईकांनी (०२१४१) २२२११८ व टोल फ्री क्रमांक १०७७ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन रायगड जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी केले आहे.
दुर्घटनेतील बेपत्ता प्रवाशांची नावे :
प्रशांत प्रकाश माने-भांडरपुळे, सुनील महादेव बैकर, स्नेहल सुनील बैकर सतकोंडी, अविनाश सखाराम मालप - कांबळे लावगण, दीपाली कृष्णा बलेकर, अनिष संतोष बलेकर, धोंडू बाबाजी कोकरे
जयगड-मुंबई या एसटी बसमधले पाच प्रवासी
दिपाली पाठकर (२८), भुषण पाठकर (29), )सेन्हा बयकर (30) सुनिल बयकर (32) आनिल बलेकर वय (11)
दरम्यान दोन प्रवाशांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.