व्हिडिओ - जबराट.... दहावीत मिळाले १०० टक्के गुण
By Admin | Published: June 6, 2016 06:35 PM2016-06-06T18:35:45+5:302016-06-06T18:37:30+5:30
अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक प्रेरणा ठरू शकेल, अशी कामगिरी तनया वाडकर नावाच्या १६ वर्षीय विद्यार्थ्याींनीने केली आहे.
ऑनलाइन लोमकत
सिंधूदुर्ग, दि. ६ : सध्या देशातील विविध राज्यांमध्ये १० वी आणि १२ वीचे निकाल येणे सुरू आहेत. अशात अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक प्रेरणा ठरू शकेल, अशी कामगिरी तनया वाडकर नावाच्या १६ वर्षीय विद्यार्थ्याींनीने केली आहे. साध्या मध्यमवर्गीय घरातील तनयाने स्वतच्या आफाट मेहनतीच्या बळावर ही कामगीरी केली आहे. ज्याला अनेक विद्यार्थी अशक्यप्राय गोष्ट मानतात असे काम तनया वाडकरने केलं आहे. दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. असून राज्यातील ३९ विद्यार्थांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. त्यापैकी तनया वाडकर एक आहे, सावंतवाडी येथिल मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. कुळसकर या छोट्याशा गावात राहणारी ही पोर.
तनयाला मराठी ९५, संस्कृत ९९ इंग्रजी ९१, गणित ९७, विज्ञान ९८ आणि इतिहास-भुगोल ९६ गुण मिळाले आहेत. ५०० पैकी ४८५ गुण घेऊन उतीर्ण झाली आहे. ग्रेड पद्धत असल्यामुळे तिला १०० टक्के गुण दिले गेले आहेत. तिने यशस्वी होण्यामागे आई-वडिल-आजी-आजोबा असल्याचं सांगीतलं, त्यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केल त्यामुळे मी यशस्वी झाल्याचं सांगीतलं .
यंदा राज्याचा निकाल ८९.५६ टक्के लागला आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही १०वीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली असून राज्यात ९१.४१ टक्के मुली तर ८७.९८ टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालाच्या टक्केवारीमध्ये १.९० टक्के इतकी घट झाली आहे