VIDEO - सोलापूरमध्ये जीप-कंटेनरचा अपघात, 4 ठार
By admin | Published: October 14, 2016 11:18 AM2016-10-14T11:18:09+5:302016-10-14T16:15:46+5:30
पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील पाकणी येथे बोलेरो - कंटनेरची धडक बसून झालेल्या अपघातात 4 जण ठार झाले.
Next
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. १४ - डिव्हायडरमधून येणाºया दुचाकीस्वारास वाचविण्याच्या नादात बेलोरो जीपच्या चालकाने रस्त्याच्याकडेला उभारलेल्या टँकरला पाठीमागून जोराची धडक दिली़ या धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली़
प्रियंका ओमकार अलोने (वय २२), नारायण रामचंद्र अलोने (वय ६५), सुलोचना नारायण अलोने (वय ५५), गोकुळ रामचंद्र अलोने (वय ४८) रा़ सर्वजण समर्थ चौक, मेनरोड अक्कलकोट हे चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर ओंकार गोकुळ अलोने (वय २५) हा गंभीर जखमी झाला असून यावर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत़
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, नारायण व सुलोचना अलोने हे दोघे आजारी होते़ या दोघांना उपचारासाठी पुण्याला घेऊन जाण्यासाठी सकाळी ६ वाजता बेलोरो जीपमध्ये बसून पुण्याकडे रवाना झाले होते़ सकाळी ९ च्या सुमारास सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील पाकणी फाट्याजवळ डिव्हायडरमधून येणाºया दुचाकीस्वारास वाचविण्याचा प्रयत्न करताना बेलोरोच्या जीपचालकाचा ताबा सुटल्याने जीपने हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या टँकरला पाठीमागून जोराची धडक दिली़ या धडकेत चार जण जागीच तर एकजण गंभीर जखमी झाले़ हा अपघात इतका भीषण होता की बेलोरो गाडी चक्काचूर झाली होती़ या अपघातानंतर टॅकर चालकास तालुका पोलीसांनी ताब्यात घेतले आहे़
अपघातानंतर पाकणी फाट्यावरील नागरिकांनी अपघातातील मृतांना व जखमींना गाडीतून बाहेर काढण्यासाठी मदत केली़ या घटनेची माहिती समजताच तात्काळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण भोसले, सहा़ पोलीस निरीक्षक विकास आडसुळ यांनी घटनास्थळाला भेट देऊन अपघातातील मयत व जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविले़ मयत नारायण रामचंद्र अलोने यांचे अक्कलकोट शहरात भांड्याचे दुकान आहे़ तर गोकुळ रामचंद्र अलोने यांचे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. याशिवाय अपघातातील जखमी असलेला आेंंकार अलोने याचे सहा महिन्यापूर्वीच विवाह झाला होता़