VIDEO - मुलं बालपणाला मुकत आहेत - संगीता बर्वे
By Admin | Published: August 13, 2016 02:09 PM2016-08-13T14:09:39+5:302016-08-13T14:09:39+5:30
आजची मुलं टीव्ही कार्टुन, विविध कला शिबिरे, या धावपळीत व्यस्त झाली आहेत. सोशल मीडियामुळे ती वयापेक्षा मोठी झाल्याचे जाणवू लागले आहे
१२ व्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन
जळगाव : आजची मुलं टीव्ही कार्टुन, विविध कला शिबिरे, या धावपळीत व्यस्त झाली आहेत. सोशल मीडियामुळे ती वयापेक्षा मोठी झाल्याचे जाणवू लागले आहे. यात मुलं बाळपणाला मुकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, असे प्रतिपादन २६ व्या अखिल भारतीय बालकुमार मराठी संमेलनाध्यक्ष तथा ख्यातनाम बाल साहित्यिक डॉ.संगीता बर्वे (पुणे) यांनी केले.
जळगाव येथे आयोजित बाल साहित्याला वाहिलेल्या १२ व्या राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ बाल साहित्यिक सुभाषचंद्र वैष्णव यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षीय भाषणातून संगीता बर्वे बोलत होत्या. आपल्या भाषणात त्यांनी, मुलांच्या विविध पैलंूवर प्रकाश टाकला. बाल साहित्याचे त्यांनी विवेचन केले. याप्रसंगी ११ व्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा माया धुप्पड, ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले (पुणे), एकनाथ आढाव (मुंबई), संघपती दलुभाऊ जैन, साहित्यिक श.दी. वढोदकर उपस्थित होते. प्रास्ताविक आयोजक सतीश जैन यांनी केले. संमेलनादरम्यान, दुपारी कवी संमेलन होणार आहे.