VIDEO- लोकमत एनपीएल क्रिकेट महासंग्रामास नाशकात प्रारंभ

By Admin | Published: December 21, 2016 11:11 PM2016-12-21T23:11:04+5:302016-12-21T23:11:04+5:30

 आॅनलाइन लोकमत नाशिक, दि. 21 - क्रिकेट शौकिनांसाठी आनंदाची पर्वणी ठरणाऱ्या राजुरी स्टील प्रस्तुत लोकमत एनपीएल सिझन-६च्या क्रिकेट महासंग्रामास ...

VIDEO - Launch of Lokmanya NPL Cricket Mahashangramas | VIDEO- लोकमत एनपीएल क्रिकेट महासंग्रामास नाशकात प्रारंभ

VIDEO- लोकमत एनपीएल क्रिकेट महासंग्रामास नाशकात प्रारंभ

Next

 आॅनलाइन लोकमत

नाशिक, दि. 21 - क्रिकेट शौकिनांसाठी आनंदाची पर्वणी ठरणाऱ्या राजुरी स्टील प्रस्तुत लोकमत एनपीएल सिझन-६च्या क्रिकेट महासंग्रामास बुधवारी (दि.२१) सायंकाळी रंगारंग सोहळ्याद्वारे प्रारंभ झाला. येत्या ३० तारखेपर्यंत चालणाऱ्या या क्रिकेट मालिकेत सहा संघांचा सहभाग आहे.

 हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या शुभारंभ सोहळ्यात नाशिकचे महापौर अशोक मुर्तडक, आमदार देवयानी फरांदे, आमदार डॉ. सुधीर तांबे, पोलीस आयुक्त रविंद्र सींघल, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण, अशोका समुहाचे चेअरमन अशोक कटारिया, बॉश कंपनीचे टेक्निकल प्लान्ट हेड अविनाश चिंतावार, नेक्सा मारुती-सुझुकीचे क्षेत्रिय व्यवस्थापक मोहित जिंदाल आदिंच्या हस्ते आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून व लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा तथा बाबुजींच्या प्रतिमेस अभिवादन करुन या क्रिकेट महासंग्रामाचे उद्घाटन करण्यात आले. लोकमतचे सहाय्यक  उपाध्यक्ष बी.बी.चांडक यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

 याप्रसंगी रंगीबेरंगी लाईट शोसह थ्री इडियट फेम क्वाडक्वॉप्टरची धमाल तसेच रोहन डान्स अकादमीच्या डान्स-शोने उपस्थितांच्या डोळ्यांची पारणे फेडली. दरम्यान, उद्घाटन समारंभानंतर एनपीएलच्या सहाव्या हंगामातील पहिला सामना संदीप फाल्कन्स विरु द्ध भदाणे हायटेक टायगर्स या संघांमध्ये रंगला. तत्पुर्वी लोकमतच्या टीमसह एनडीसीए, भदाणे हायटेक टायगर्स, स्टार वॉरियर्स, संदीप फाल्कन्स, नाशिक चैलेंजर्स, अथर्व रॉयल्स या संघांच्या खेळाडुंनी मैदानाला फेरी मारून संचलन केले. 

https://www.dailymotion.com/video/x844m8x

Web Title: VIDEO - Launch of Lokmanya NPL Cricket Mahashangramas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.