VIDEO: महापालिका इंजिनिअरांची बिल्डरांसोबत दारू पार्टी
By Admin | Published: February 5, 2017 04:54 PM2017-02-05T16:54:45+5:302017-02-05T16:54:45+5:30
ऑनलाइन लोकमत वसई, दि. 5 - वसई विरारमध्ये महापालिकेत ठेका पद्धतीवर काम करणारे ठेकेदार अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांसोबत पार्टीत ...
ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 5 - वसई विरारमध्ये महापालिकेत ठेका पद्धतीवर काम करणारे ठेकेदार अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांसोबत पार्टीत दारू पिऊन बेधुंद झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी सुट्टी असतानाही महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी 12 इंजिनिअरांना निलंबित केले.
वसई विरारमध्ये अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डर्ससोबत चक्क महापालिकेच्या इंजिनिअर्सनी दारु पिऊन डान्स केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. स्वरुप खानोलकर नावाच्या पालिकेतील ठेका इंजिनिअरच्या बर्थडे पार्टीचे 24 जानेवारीला विरारच्या एका रिसॉर्टमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. पार्टी जरी खाजगी असली, तरी हा प्रकार अशोभनीय असल्याचं म्हटलं जातं.
स्वरूप खानोलकर ( मुख्य अभियंता अनधिकृत) बांधकाम यांच्यासह पार्टीत नरेंद्र संखे , योगेश सावंत, रोशन भागात , केयूर पाटील , प्रवीण मुलीक , निनाद सावंत , कौस्तुभ तामोरे , निलेश मोरे , इंद्रजीत पाटील , परमजीत वर्तक , युवराज पाटील यांनी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरासोबत मद्यधुंद नाच केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. विशेष म्हणजे येथे फटाक्यांची आतषबाजी , डीजे होता , विदेशी मद्यही होते. वसईच्या समुद्रकिनारी रात्री उशीरापर्यंत ही जंगी पार्टी सुरु होती.
महापालिकेत कायमस्वरूपी अधिकारी असताना अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे अधिकार आयुक्त लोखंडे यांनी ठेका पद्धतीवर काम करणाऱ्या खानोलकरकडे दिले होते. खानोलकर यांच्या अहवालानंतर कारवाई केली जात होती. कायमस्वरूपी अधिकाऱ्यांना खानोलकर यांच्या हाताखाली काम करावे लागत होते. त्यामुळे अधिकारानंमध्ये तीव्र नाराजी होती. तर दुसरीकडे खानोलकर आणि नरेंद्र संखे यांच्या कार्य पद्धतीवर संशय व्यक्त केला जात होता. आता ठेका पद्धतीवर काम करणाऱ्या इंजिनियरांचे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या असलेले साटेलोटे उजेडात आले आहेत.
https://www.dailymotion.com/video/x844qgi