VIDEO - सौरऊर्जेच्या क्षेत्रात भरपूर संधी

By admin | Published: June 10, 2017 01:56 PM2017-06-10T13:56:33+5:302017-06-10T14:06:32+5:30

‘सर्वांसाठी ऊर्जाच घडवेल देशाचे भविष्य’ या संकल्पनेवर आधारित ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे ‘लोकमत ऊर्जा समिट २०१७’ मुंबईत सुरु आहे.

VIDEO - A lot of opportunities in the field of solar energy | VIDEO - सौरऊर्जेच्या क्षेत्रात भरपूर संधी

VIDEO - सौरऊर्जेच्या क्षेत्रात भरपूर संधी

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 10 - ‘सर्वांसाठी ऊर्जाच घडवेल देशाचे भविष्य’ या संकल्पनेवर आधारित ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे ‘लोकमत ऊर्जा समिट २०१७’ मुंबईत सुरु आहे. ‘रिन्युएबल एनर्जी : ट्रान्सफॉर्मिंग द इंडियन इलेक्ट्रिसिटी लॅण्डस्केप’ या विषयावर चर्चासत्र सुरु असून, विविध तज्ञांनी यावर आपली मते मांडली आहेत. 
 
सौरऊर्जेच्या क्षेत्रात उत्तम प्रकारे काम सुरु असून, या क्षेत्रात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत - विजय करिया, रवीन ग्रुप ऑफ कंपनी’चे अध्यक्ष
 
उत्पादनांच्या किंमती परवडू शकतील अशा पद्धतीने कमी होत आहेत, तंत्रज्ञानाचा वेगाने विकास होत असल्याने या क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत - विजय करिया. 
 
सौरऊर्जेबरोबर पवन ऊर्जेकडे लक्ष द्यावे, सरकराने नियंत्रकाच्या भूमिकेऐवजी सुविधा पुरवण्याची भूमिका घ्यावी - विजय करिया
पहिले रिन्युव्हेबल एनर्जी मॅनेजमेंट सेंटर आम्ही सुरु केले, गेल्या काही वर्षात सरकारच्या प्रयत्नामुळे हे क्षेत्र वाढले आहे - अनिश राजगोपाल. 
 
रिन्युव्हेबल एनर्जी क्षेत्र वेगाने वाढले तर, सर्वांचा फायदा, स्टोरेजचा खर्च कमी व्हावा - अनिश राजगोपाल.
इलेक्ट्रीसिटीच्या वापरामध्ये वाढ होणार आहे, त्यानुसार उत्पादन व वितरणाचे नियोजन करावे लागेल - कुलदीप जैन, ‘क्लीनमॅक्स सोलार’चे व्यवस्थापकीय संचालक 
 
 नजीक भविष्यात छतावर सौरऊर्जेचा पर्याय स्वीकारावाच लागेल, हे अटळ आहे - कुलदीप जैन
 

Web Title: VIDEO - A lot of opportunities in the field of solar energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.