VIDEO : ओला कचरा जिरवून पुण्याच्या महापौरांनी साकारली बाग

By Admin | Published: June 5, 2017 11:20 PM2017-06-05T23:20:04+5:302017-06-05T23:20:04+5:30

 ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 5 -  दिवसेंदिवस भीषण होत चाललेल्या कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कच-याचे वर्गीकरण आणि ओल्या कच-यापासून ...

VIDEO: The mayor of Pune, by the cancellation of the waste, | VIDEO : ओला कचरा जिरवून पुण्याच्या महापौरांनी साकारली बाग

VIDEO : ओला कचरा जिरवून पुण्याच्या महापौरांनी साकारली बाग

googlenewsNext
 ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 5 -  दिवसेंदिवस भीषण होत चाललेल्या कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कच-याचे वर्गीकरण आणि ओल्या कच-यापासून खत निर्मिती यावर भर देण्याचे आवाहन नागरिकांना पुणे महापालिकेकडून करण्यात येते. मात्र, लोकप्रतिनिधी स्वत:च त्याचे अनुकरण करीत नाहीत, असा नागरिकांमध्ये समज असतो. या गैरसमजाला महापौर मुक्ता टिळक यांनी फाटा दिला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये तब्बल तीन ते साडेतीन टन कचरा जिरवून त्यांनी घराच्या छतावर सुंदरशी बाग तयार केली आहे.
शहरातील कचरा समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ऊरुळी येथील कचरा डेपो हलविण्यासंदर्भात ग्रामस्थ आंदोलन करीत आहेत. तर दुसरीकडे पिंपरी सांडस येथे कचरा टाकू न देण्याचा पवित्रा तेथील लोकप्रतिनिधींनी घेतला आहे. पर्यावरण म्हटले की सर्वजण वृक्षारोपणाचाच विचार करतात. मात्र, कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करणे हे सुद्धा पर्यारणाचेच रक्षण आहे या भावनेमधून टिळक यांनी घरामध्येच ओला कचरा जिरवायला सुरुवात केली. पुणे महापालिकेकडून ओला व सुका कच-याचे वर्गीकरण करण्यासाठी मोहिम हाती घेतली होती. सोसायट्यांमध्ये कच-यापासून खतनिर्मितीचे प्रकल्प केल्यास करामध्ये पाच टक्के देण्यासही सुरुवात करण्यात आली होती. ओला कचरा जागच्या जागी जिरवण्यासंदर्भात पालिका तसेच स्वयंसेवी संस्थांकडून जनजागृतीवर भर देण्यात आला होता.
 
ओला कचरा जर जिरवला गेला तर समस्या सुटण्यास मोठी मदत मिळणार आहे. लोकप्रतिनिधी लोकांना कचरा जिरवण्याचे आवाहन करतात. परंतु, स्वत: त्याचे अनुकरण करीत नाहीत. महापौर टिळक यांनी मात्र घराच्या छतावर वीटांचे बांधकाम असलेले दहा पिट्स तयार केले आहेत. या पिट्समध्ये ओला कचरा टाकून त्याचे कंपोस्ट खतामध्ये रुपांतर केले जाते. या पिट्समध्ये त्यांनी झाडे लावली आहेत. यासोबतच छोट्या छोट्या कुंड्यांमध्येही त्यांनी झाडे लावलेली आहेत. दोन वर्षांपासून त्यांनी ओला कचरा जिरवायला सुरुवात केली. आजवर या पिट्समध्ये जवळपास तीन ते साडेतीन ओला कचरा जिरवला गेल्याचे टिळक यांनी सांगितले. 
 
या बागेमध्ये जवळपास 200 झाडे आहेत. यामध्ये गुलाब, पांढरा चाफा, मोगरा अशी फुलझाडे आहेत. डाळींब, पपईची झाडे आहेत. कारल्याचा वेलही या बागेमध्ये आहे. घराच्या आवारात असलेल्या दुस-या इमारतीच्या छतावरही त्यांनी ओला कचरा जिरवण्यासाठी पिट्स तयार केलेली आहेत. त्याठिकाणीही झाडे लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. दैनंदिन वापरातील भाज्यांचे देठ, शिळे अन्न, भाज्या कापल्यानंतर शिल्लक राहीलेला भाग या पिट्समध्ये टाकला जातो. महापौर स्वत: या बागेमध्ये अजूनही लक्ष देतात. घरातील देव्हा-यात याच बागेतील फुले जातात. ओल्या कच-याची समस्या सोडविण्यासाठी महापौरांनी वैयक्तिक पातळीवर केलेल्या या प्रयत्नाचे सर्वांनीच अनुकरण करायला हवे. 
 
 
https://www.dailymotion.com/video/x8451tn


गेल्या दोन वर्षांपासून घराच्या छतावर ओला कचरा जिरवण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत जवळपास तीन ते साडेतीन टन कचरा जिरवला आहे. बागेमध्ये लावलेली सर्व झाडे छान आली आहेत. मी स्वत: बागेमध्ये लक्ष घालून ती जपली आहे. महापौर झाल्यापासून खुप वेळ देता येत नाही, परंतु शक्य होईल तेवढे बागेकडे लक्ष देते. नागरिकांनीही ओला कचरा आपल्या सोसायटीमध्ये, घराच्या छतावर जिरवल्यास कचरा प्रश्न सुटण्यास त्याची मदतच मिळणार आहे. 
- मुक्ता टिळक, महापौर, पुणे

Web Title: VIDEO: The mayor of Pune, by the cancellation of the waste,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.