VIDEO : सैराट गाण्यातून दिला शौचालय बांधण्याचा संदेश
By admin | Published: September 21, 2016 11:49 AM2016-09-21T11:49:36+5:302016-09-21T11:54:39+5:30
वाशिममध्ये स्वच्छता अभियानाअंतर्गत शिलाबाई घुगे नामक महिला गाण्यातून शौचालय बांधण्याचा संदेश देत आहेत.
Next
नंदकिशोर नारे, ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि.२१ - जिल्हा परिषदेच्यावतिने स्वच्छता गृहभेटी कार्यक्रम जिल्हयात प्रभाविपणे राबवित येत असतांनाच नगरपरिषदेच्यावतिने सुध्दा भारत स्वच्छ अभियानांतर्गंत मोहीमेस जोरदार सुरुवात झाली आहे. यामध्ये सुशिलाबाई घुगे नामक महिला या अभियानात नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. शहरात सर्वांनी शौचालय बांधण्यासाठी सुशिलाबाई आपल्या गाण्यातून नागरिकांना शौचालय बांधण्याचे आवाहन करत आहेत.
ते गाणं आहे,
बांध..बांध..बांध..बांध..बांध......
समद्या गावाला झाली संडास बांधण्याची घाई
नव-याले माह्या सांगू सांगू थकले गं बाई...
वाशिम नगरपरिषदेचे नव्यानेच रुजू झालेले मुख्याधिकारी गणेश शेटे स्वच्छतेबाबत व शौचालयाबाबत जागृत असल्याने जिल्हयातील सर्व नगरपालिकेतून या उपक्रमात वाशिम आघाडीवर दिसून येत आहे. दररोज शहरातील सर्व्हेक्षणानुसार ज्या भागात लोकांच्या घरी शौचालये नाहीत त्या परिसराला भेटी देवून त्यांच्यामध्ये जनजागृतीचे काम हाती घेतले आहे. शहरातील अर्धाअधिक भाग मुख्याधिकारी गणेश शेटे व त्यांच्या चमूनी पिंजुन काढला आहे. शौचालयाअभावी उघडयावर शौच करण्याने काय होते, स्वच्छता का पाळावी यासह यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाच्यावतिने करण्यात येत आहे. या कार्यक्रमामध्ये नगरपरिषद मुख्याधिकारी आवर्जुन उपस्थित राहतांना दिसून येत आहेत. सद्या शहरामध्ये सैराट चित्रपटातील गित ‘झिंग झिंग झिंगाट...’ या गिताच्या चालीवर असलेल्या ‘बांध..बांध...बांध’ या गीताची जोरदार चर्चा होतांना दिसून येत आहेत.