VIDEO: चेंबूरमध्ये एकाच ट्रॅकवर आल्याने मोनोची एकमेकांना टक्कर

By Admin | Published: July 8, 2017 09:53 PM2017-07-08T21:53:50+5:302017-07-08T23:03:09+5:30

ऑनलाइन लोकमत   मुंबई, दि. 8 - दोन मोनोरेल एकाच ट्रॅकवर आल्याने टक्कर झाली आहे. चेंबूरमध्ये दोन मोनोरेल एकाच ...

VIDEO: Mono collides with one on one track in Chembur | VIDEO: चेंबूरमध्ये एकाच ट्रॅकवर आल्याने मोनोची एकमेकांना टक्कर

VIDEO: चेंबूरमध्ये एकाच ट्रॅकवर आल्याने मोनोची एकमेकांना टक्कर

Next
ऑनलाइन लोकमत
 
मुंबई, दि. 8 - दोन मोनोरेल एकाच ट्रॅकवर आल्याने टक्कर झाली आहे. चेंबूरमध्ये दोन मोनोरेल एकाच वेळी एकाच ट्रॅकवर आल्या होत्या. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नसून मोठा अनर्थ टळला आहे. मोनोरेलमध्ये प्रवासी अडकले असून अडकलेल्या प्रवाशांना काढण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आहे. सध्या अग्निशन दल अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढत असून बचावकार्य सुरु आहे. मोठा अनर्थ टळला असला तरी या घटनेमुळे मोनोची अद्यावत यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे. 
 आज रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दोन मोनोरेल एकाच ट्रॅकवर आल्या. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. या दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एका प्रवाशाचा जीव गुदमरल्याने त्याला स्ट्रेचरवरून खाली नेण्यात आले. घटनास्थळावर चेंबूर पोलीस आणि मोनोचे अधिकारी पोहोचले असून ट्रेन बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
 

https://www.dailymotion.com/video/x84577x

मोनोरेलच्या जनसंपर्क अधिका-यांनी मात्र असं काही झालं नसून मोनो एकमेकांसमोर आल्या नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. चेंबूरच्या दिशेने जाणा-या मोनोमध्ये तांत्रिक बिघाड झाला असल्या कारणाने प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी दुसरी मोनो पाठवली होती असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. 
 
लोकमतच्या रिअल टाईम अपडेटने अधिकाऱ्यांची धावाधाव...
- चेंबूर येथे एकाच ट्रॅकवर दोन मोनो समोर आल्या होत्या. चालकांनी प्रसंगावधान दाखवल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या घटनेचे रिअल टाईम अपडेट सर्वप्रथम लोकमत वेबवर फोटोसह झळकले. हे वृत्त दिसताच अधिकारी वर्गांसह माध्यम प्रतिनिधींची धावाधाव झाली.
 
 

Web Title: VIDEO: Mono collides with one on one track in Chembur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.