VIDEO : पालिकेच्या दिरंगाईविरोधात मुंबईकरांची ‘शर्म करो, कुछ तो काम करो’ मोहीम

By Admin | Published: October 18, 2016 11:22 AM2016-10-18T11:22:42+5:302016-10-18T13:41:37+5:30

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील नागरी कामे वेळेवर आणि नीट पद्धतीने पार पडत नसल्यामुळे मुंबईकरांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे.

VIDEO: Mumbaikars 'shy away, do some work' campaign against the boycott of the corporation | VIDEO : पालिकेच्या दिरंगाईविरोधात मुंबईकरांची ‘शर्म करो, कुछ तो काम करो’ मोहीम

VIDEO : पालिकेच्या दिरंगाईविरोधात मुंबईकरांची ‘शर्म करो, कुछ तो काम करो’ मोहीम

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील नागरी कामे वेळेवर आणि नीट पद्धतीने पार पडत नसल्यामुळे मुंबईकरांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. मग ती रस्त्यांची कामे असोत वा कचऱ्याचा प्रश्न असो, अनधिकृत बांधकामे असोत वा वाटेत येणारे फेरीवाले असो,  या सर्व समस्यांबाबत कितीही तक्रारी किंवा गाऱ्हाणी पालिकेच्या दरबारात मांडली तरी पालिकेचे कर्मचारी अथवा अधिकारीवर्ग ढिम्म हलत नाही. हेच लक्षात घेऊन या आठवड्यापासून पुढील दहा दिवस ‘फ्री अ बिलियन’ संस्थेच्या पुढाकाराने मुंबईतील ठिकठिकाणच्या पालिका वॉर्ड कार्यालयासमोर ‘शर्म करो, कुछ तोकाम करो’ ही मोहीम राबवली जाणार आहे. १८ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान आयोजित या मोहीमेत विभागीय स्तरावर काम करणाऱ्या नागरिकांच्या समन्वयातून मुंबईत विविध ठिकाणी असलेल्या पालिकेच्या वॉर्ड कार्यालयाबाहेर अभिनव कार्यक्रम करण्यात येणार आहेत.

Web Title: VIDEO: Mumbaikars 'shy away, do some work' campaign against the boycott of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.