VIDEO - शरीअतच्या समर्थनार्थ मुस्लिम महिलांचे धरणे

By admin | Published: October 21, 2016 09:33 PM2016-10-21T21:33:08+5:302016-10-21T21:33:08+5:30

मुस्लिम पर्सनल लॉ मधील शरीअतवर आक्षेप नोंदवून केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या विरोधात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो मुस्लिम महिलांनी धरणे दिलेत

VIDEO - Muslim women's support in support of the body | VIDEO - शरीअतच्या समर्थनार्थ मुस्लिम महिलांचे धरणे

VIDEO - शरीअतच्या समर्थनार्थ मुस्लिम महिलांचे धरणे

Next

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २१ : मुस्लिम पर्सनल लॉ मधील शरीअतवर आक्षेप नोंदवून केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या विरोधात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो मुस्लिम महिलांनी धरणे दिलेत. धरणे आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. अकोला शहरात प्रथमच एवढ्या मोठ्याप्रमाणात मुस्लिम महिला धरणे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

तलाक प्रथेवर आक्षेप घेणारी याचिका शासनाने परत घ्यावी. शरीअत कायद्याला मुस्लिम महिलांचे समर्थन आहे. शासनाने मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये ढवळा-ढवळ करू नये. संविधानिक हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न केल्यास हाणून पाडल्या जाईल असा ईशारा येथे दिला गेला. दुपारी तीन वाजतापासून तर पाच वाजेपर्यंत बुरखाधारी महिला धरणे आंदोलनात सहभागी होत होत्या. जमाअत- ए-इस्लामी, हिंद, अकोला महिला विभागच्या सलमा सरवत आणि गर्ल्स इस्लामिक आॅर्गनायजेशन आॅफ इंडिया अकोलाच्या एमन खान यांनी या धरणे आंदोलनाचे नेतृत्व केले.

बुरखाधारी महिलांच्या हाती मुस्लिम लॉ आणि शरीयत समर्थनाचे फलक हाती होते. शाळा, महाविद्यालयीन युवती आणि बुरखाधारी महिलांनी हा परिसर व्यापला होता. शहरातील विविध भागांत पायी आणि वाहनातून धरणे आंदोलनात महिला सहभागी होऊ लागल्याने पोलिस बंदोबस्त तातडीने येथे वाढविला गेला. मुस्लिम महिलांसोबत पुरूष मंडळीही येथे मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. आंदोलनातील महिलांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून आपल्या भावना व्यक्त केल्यात. निवेदन दिल्यानंतर या महिलांनी येथे शरीअत संदर्भातील मनोगत जाहीरपणे मांडलेत. धरणे आंदोलनानंतर येथे टाकल्या गेलेला पाणीपाउचचा कचराही सहभागी झालेल्या महिलांनी तातडीने उचलून नवा आदर्श निर्माण केला.

Web Title: VIDEO - Muslim women's support in support of the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.