VIDEO : आॅक्सिजन अभावी मुठा-मुळा मृतावस्थेत

By Admin | Published: June 11, 2017 10:43 PM2017-06-11T22:43:14+5:302017-06-11T22:46:52+5:30

 सुषमा नेहरकर-शिंदे/ ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 11 -  शहराच्या जीवनवाहिन्या म्हणून ओळख असलेल्या मुळा-मुठा या दोन्ही नद्या प्रचंड प्रदूषणामुळे ...

VIDEO: Mutha-Mula dead in want of oxygen | VIDEO : आॅक्सिजन अभावी मुठा-मुळा मृतावस्थेत

VIDEO : आॅक्सिजन अभावी मुठा-मुळा मृतावस्थेत

Next
 सुषमा नेहरकर-शिंदे/ ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 11 -  शहराच्या जीवनवाहिन्या म्हणून ओळख असलेल्या मुळा-मुठा या दोन्ही नद्या प्रचंड प्रदूषणामुळे मृतावस्थेत गेल्या असल्याची धक्कादायक माहिती लोकमतच्या पाहणीमध्ये समोर आली आहे. शहराच्या मध्यातून वाहणा-या मुठा नदीतील पाण्याच्या गुणवत्तेचे परिक्षण केले असता डिझॉल्वड आॅक्सिजन (डीओ) चक्क शुन्य ते एक पर्यंत खाली आले असल्याचे निदर्शनास आले. 
‘जीवितनदी-लिव्हिंग रिव्हर फाउंडेशनच्या’ वतीने मुळा-मुठा नदीचे पुन्हा पुनरुज्जीवन करण्यासाठी ‘दत्तक घेऊया नदी किनारा’ उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमा अतंर्गत मुळा-मुठा विषयी अत्मियता असणारे व आपली नदी पुन्हा पूर्वीसारखी स्वच्छ, सुंदर व वाहती करण्यासाठी काही पुणेकर एकत्र येऊन विठ्ठलवाडी मंदिर परिसरातील मुठा नदीचा किनारा दत्तक घेतला आहे. गेल्या महिन्याभरापासून हा उपक्रम सुरु असून, नदी स्वच्छ करण्यासाठी नागरिकांची संख्या वाढत आहे. या उपक्रमा अतंर्गत  जल बिरादरी चे विनोद बोधनकर यांनी रविवारी (दि.११) रोजी सकाळी ६ वाजता विठ्ठल मंदिर परिसरातील मुठा नदीच्या पाण्याचे नमुने घेऊन उपस्थित पुणेकरांना परिक्षण करून दाखवले. यावेळी मुठा नदीच्या पाण्यात डिझॉल्वड आॅक्सिजन (डीओ) चे प्रमाण शुन्य असल्याचे धक्कादायक परिक्षण समोर आले.
याबाबात विनोद बोधनकर यांनी सांगितले की,  गेल्या काही वर्षांत पुणे शहरातील वाढत्या लोकवस्तीमुळे मुठा-मुळा नद्या बेसुमार प्रदूषण झाले आहे. पाण्यामध्ये विरघळणा-या डिझॉल्वड आॅक्सिजन (डीओ) चे प्रमाण साधारण ८ पीपीएम इतके असते.  खडकवासलाच्या पाण्यामध्ये हे प्रमाण ८ पीपीएम ऐवढे मिळायाचे. परंतु गेल्या दोन-तीन महिन्यांपासून खडकवासला धरणाच्या पाण्याचील डिझॉल्वड आॅक्सिजन चे प्रमाण देखील ७.५ पर्यंत खाली आले आहे. गेल्या काही वर्षांत या दोन्ही नद्यामध्ये प्रचंड प्रमाणात जैविक व रासायनीक कचरा फेकला जात आहे. या कच-याचे विघटन होऊन हा कचरा पाण्यातील डिझॉल्वड आॅक्सिजन खाऊन टाकतो. यामुळे आता खडकवासला ते संगम पुलापर्यंत विविध ठाकाणी नदीच्या पाण्याचे नमुने तपासले असता डिझॉल्वड आॅक्सिजनचे प्रमाण शुन्य ते १ पर्यंत कमी झाले आहे. पाण्यातील डिझॉल्वड आॅक्सिजनचे प्रमाण ४ पेक्षा कमी झाल्यावर मासे किंवा अन्य जलजीव मरण्यास सुरुवात होते. त्यामुळे पुण्याच्या मुळा-मुठाचे प्रदूषण पातळी किती प्रचंड खाली गेली हे स्पष्ट होते.
 
 मुठा-मुळा पुन्हा जिवंत करण्यासाठी पुणेकरांनी पुढे यावे
नदीचे पुनरुज्जीवन स्थानिक लोकांच्या सहभागाशिवाय अशक्य आहे. यामुळेच सरकारी यंत्रणेसोबत काम करण्याबरोबरच लोकांमध्ये नदी आणि नदी प्रश्नाबद्दल जागृती करण्यासाठी लिव्हिंग रिव्हर फाउंडेशनच्या वतीने ‘दत्तक घेऊया नदी किनार’ मोहिम हाती घेतली आहे. या लोकांना एकत्र घेऊन जनजागृतीतून नदी संवर्धन विषयक कार्यक्रमांत लोकसहभाग वाढविणे, घातक रसायन विरहीत जीवनशैलीचा प्रसार करून प्रदूषणाचे स्त्रोत कमी करणे व नदीच्या सध्याच्या स्थितीचा अभ्यास करून नदी पुनरुज्जीवन व व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी दर रविवारी सकाळी ६.३० वाजता विठ्ठस मंदिर, सिंहगडरोड परिसरात नागरिक एकत्र येऊन या उपक्रमाला सुरुवात केली आहे. यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे.
- अदिती देवधर, जीवितनदी-लिव्हिंग रिव्हर फाउंडेशन

 

https://www.dailymotion.com/video/x8453d6

Web Title: VIDEO: Mutha-Mula dead in want of oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.