VIDEO : नागपूरकर धावले, नागपूरकर जिंकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2017 03:58 PM2017-02-26T15:58:58+5:302017-02-26T16:07:48+5:30
ऑनलाइन लोकमत नागपूर, दि. 26 - नागपूरकर धावले, नागपूरकर जिंकले. होय, रविवारी भल्या सकाळी उपराजधानीतील विविध मार्ग निळ्या टी ...
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 26 - नागपूरकर धावले, नागपूरकर जिंकले. होय, रविवारी भल्या सकाळी उपराजधानीतील विविध मार्ग निळ्या टी शर्ट घातलेल्या धावपटूंनी फुलले होते. पोलीस लाईन टाकळी, सेमीनरी हिल्स, फुटाळा तलाव, अंबाझरी तलाव, रामनगर, रविनगर, फुटाळा तलाव, वायुसेननानगर, सि.जी.ओ. कॉप्लेक्स, गोंडवाना क्लब, रामगीरी वॉकर्स स्ट्रीट, जी.पी.ओ. चौक, आयकर भवन, सेमीनरी हिल्स परिसरात एक वेगळा उत्साह संचारलेला दिसत होता. निमित्त होते मॅराथॉन स्पर्धेचे.
शहर पोलिसांतर्फे आयोजित मॅराथॉन स्पर्धेला रविवारी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे पाच हजारांवर धावपटूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. काटोल मार्गावरील पोलीस मुख्यालयाच्या शिवाजी स्टेडिअममधून सकाळी 5.3क् वाजता स्पर्धेला सुरूवात झाली. 3, 5, 1क् आणि 21 किलोमिटर अशा चार गटात मॅराथॉनचे आयोजन करण्यात आले होते. चारही गटात स्पर्धकांनी चांगला सहभाग नोंदवला. सुमारे 5 हजारांवर स्पर्धक चार गटात सहभागी झाले. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धकांना शुभेच्छा देत स्पर्धेला हिरवी ङोंडी दाखवली. महामेट्रो कॉपोर्रेशन लि. नागपूर, एल. अॅण्ड टी, अॅक्सीस बँक, क्लाउड फॉरेन्सीक टेक्नॉलॉजी, स्पेसवुड, हल्दीराम, 93.5 रेड एफएम, वर्षा अॅड, ऑरेंज सिटी रनर आदी या स्पर्धेचे प्रायोजक होते. स्पर्धेचे आयोजन शिस्तबद्ध अन् उत्कृष्ट होते. 1क् किलोमिटर गटात धावणा-या स्पर्धकांसाठी दर दीड किलोमिटरनंतर सोललेली संत्री, केळी, माझा अन् बिसलरीच्या बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या. वैद्यकीय पथकेही सज्ज होती.
महासंचालकांतर्फे कौतूक
खास मॅराथॉनच्या निमित्ताने पोलीस महासंचालक सतीशचंद्र माथूर आज भल्या सकाळी नागपुरात पोहचले. विमानाला काहीसा उशिर झाल्यामुळे येता-येताच त्यांनी स्पर्धक आणि आयोजकांची माफी मागितली. पोलीस आणि जनतेचा संवाद वाढावा, त्यांनी मिळून मिसळून काम करावे, अशी पोलीस दलाची भावना आहे. नागपुरात मॅराथॉनच्या निमित्ताने त्याची चांगली सुरुवात झाल्याचे बघायला मिळत आहे, असे मत पोलीस महासंचालकांनी व्यक्त केले. नागपुरकरांच्या खेळाडू वृत्तीचा यातून प्रत्यय आल्याचेही माथूर म्हणाले. उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी पोलीस आयुक्त आणि त्यांच्या सहका-यांचे कौतूक केले.
https://www.dailymotion.com/video/x844svb