VIDEO- नाशिकमध्ये श्रीसंत निवृत्तीनाथ यांच्या यात्रोत्सवाला होणार सुरुवात
By Admin | Published: January 22, 2017 09:09 PM2017-01-22T21:09:21+5:302017-01-22T21:09:21+5:30
ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 22 - बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये येत्या सोमवारपासून (दि.२३) श्रीसंत निवृत्तीनाथ ...
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 22 - बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये येत्या सोमवारपासून (दि.२३) श्रीसंत निवृत्तीनाथ यांचा यात्रोत्सव सुरू होत आहे. संत निवृत्तीनाथांची समाधी असलेले मंदिर त्र्यंबकेश्वरमध्ये असून दरवर्षी एकादशीला या ठिकाणी यात्रा भरते.
यावेळी हजारो वारकरी या उत्सवात सहभागी होतात. दुपारी संत निवृत्तीनाथांच्या पालखीच्या रथाची मिरवणूक काढण्यात येते. हा रथ संपूर्णत: चांदीमध्ये बनविण्यात आला आहे. संपूर्ण राज्यातून नाशिकमार्गे वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. संपूर्ण त्र्यंबकनगरी संतनामाच्या जयजयकाराने दुमदुमली असून भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली आहे.
दरम्यान, वारकऱ्यांनी निवृत्तीनाथांच्या चरणी लीन होण्यापुर्वी त्र्यंबकेश्वरच्या शिववर रिंगण करत संतनामाचा गजर केला. या रिंगण सोहळ्याने भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
https://www.dailymotion.com/video/x844p2r