VIDEO : यशस्वी होण्याचा ध्यास घेतला पाहिजे - चेतन भगत

By admin | Published: October 6, 2016 12:27 PM2016-10-06T12:27:50+5:302016-10-06T16:02:50+5:30

तुम्ही सतत स्वत:ला आव्हान दिले पाहिजे. यशस्वी होण्याची ध्यास घेतला पाहिजे. स्वत:शी प्रामाणिक राहणं हीच यशस्वी होण्याची गुरूकिल्ली आहे.

VIDEO: Need to be successful - Chetan Bhagat | VIDEO : यशस्वी होण्याचा ध्यास घेतला पाहिजे - चेतन भगत

VIDEO : यशस्वी होण्याचा ध्यास घेतला पाहिजे - चेतन भगत

Next

ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. ६ - तुम्ही सतत स्वत:ला आव्हान दिले पाहिजे. यशस्वी होण्याची आवड असली  पाहिजे. स्वत:शी प्रामाणिक राहणं हीच यशस्वी होण्याची गुरूकिल्ली आहे असा सल्ला प्रसिद्ध लेखक चेतन भगतने 'हाऊ टू बी अ सुपर अ‍ॅचिव्हर' या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना दिला. 
 
साईबालाजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि लोकमत नॉलेज फोरम यांच्या माध्यमातून नव्या पिढीतील प्रसिद्ध लेखक असलेल्या चेतन भगतशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत असून पुण्यातील नामांकित महाविद्यालयांतील विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थि आहेत. 
या कार्यक्रमात बोलताना चेतन भगत दिलखुलासपणे विविध विषयांवर आपली मते व्यक्त करत आहेत. माझे नवे (वन इंडियनगर्ल) हे पुस्तक एका मुलीच्या दृष्टिकोनातून लिहीणं, माझ्यासाठी कठीण होतं असे भगत यांनी सांगितलं. 
 
 
चेतनच्या भाषणातील महत्वपूर्ण मुद्दे : 

 
- यशाचा मूलमंत्र म्हणजे - तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक, उत्तम देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आत्मशोधाची प्रक्रिया सतत सुरू रहावी. जे काम कराल त्यात झोकून देण्याची, समर्पणाची वृत्ती पाहिजे. संयम राखला पाहिजे. एकला चालो रे वृत्ती सोडली पाहिजे. आणि नम्रता अंगी बाणवली पाहिजे. त्यामुळेच तुमचा उत्कर्ष होऊ शकतो.
 
-  स्वत:मध्ये बदल घडवून परिपूर्ण बनण्यात इतके गुंग व्हा की, तुम्हाला इतरांचे दोष काढण्यास वेळच मिळू नये.
 
- अंगात नम्रता असणं हे सगळ्यात महत्वाचं. नम्रतेमुळेच तुमचा उत्कर्ष होतो.
 
-  यशस्वी होण्याचे मूलमंत्र -: १) तुमचं ध्येय काय आहे ते स्पष्ट ठरवा. २) त्यामागचं कारण जाणून घ्या. 
   ३) ते ध्येय साध्य करण्यासाठी योग्य व्यक्तींच्या संपर्कात रहा. ४) ध्येय साध्य करण्यासाठी सविस्तर योजना आखा. 
   ५) ध्येय साध्य करण्यापासून परावृत्त करणा-या करणारी कारण दूर सारा. ६) शेवटची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट        म्हणजे स्वत:वर विश्वास ठेवा.
 
- प्रेरणेसाठी 'धक्का मार' ही संकल्पना अत्यावश्यक आहे.
 
- मी सर्वोत्तम नाही हे खरं असलं तरी मी एक बेस्टसेलर लेखक आहे.
 
- माझं म्हणणं (लोकांपर्यंत) पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे.
 
- मनोरंजनाच्या माध्यमातून बदल घडवण्यासाठी मी लिहीतो.
 
- माझे टीकाकार मला अजून समजूच शकलेले नाहीत. 
 
- स्वत:चं एक ध्येय निश्चित करणं, हीच यश मिळवण्याची गुरूकिल्ली आहे.
 
- तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त (काम) करणे,मिळवणे, यालाच यशस्वी होणं म्हणतात.
 
- यशाची कोणाशीही तुलना करता येत नाही.
 
-  यशस्वी होण्याची ओढ वाटली पाहिजे. स्वत:शी प्रामाणिक राहणं हीच यशस्वी होण्याची गुरूकिल्ली आहे.
 
- तुम्ही सतत स्वत:ला आव्हान दिले पाहिजे - 'हाऊ टू बी अ सुपर अ‍ॅचिव्हर' कार्यक्रमात लेखक चेतन भगतचा विद्यार्थ्यांना सल्ला.
 
 
 
 
 
 
चेतन भगत हे विशेषत: तरुण मुलांमध्ये लेखक म्हणून अतिशय लोकप्रिय आहेत. सध्याचे आघाडीचे बेस्टसेलर लेखक म्हणून त्यांचे नाव देशविदेशात सन्मानाने घेतले जाते. भारतीय लेखक, स्तंभलेखक, प्रेरणादायी वक्ते म्हणून सुपरिचित आहेत. फाईव्ह पॉईंट समवन, वन नाईट अ‍ॅट कॉलसेंटर, ३ मिस्टेक्स आॅफ माय लाईफ, मेकिंग इंडिया आॅसम ही त्यांची काही गाजलेली पुस्तके आहेत. त्यांच्या पुस्तकांवर बॉलीवूडमध्ये ३ इडियट्स, काय पो छे, टू स्टेट्स असे गाजलेले चित्रपटही बनलेले आहेत. विविध संस्था संमेलनांतून ते व्याख्यानेही देतात. या निमित्ताने चेतन यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली त्यामुळे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक पर्वणी ठरली. 
 

Web Title: VIDEO: Need to be successful - Chetan Bhagat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.