VIDEO : 500 रुपयाची नवीन नोट चलनात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2016 01:46 PM2016-11-17T13:46:13+5:302016-11-17T13:43:27+5:30
ऑनलाइन लोकमत मुंबई, दि, 17 - नोटाबंदीचा निर्णय लागू केल्यानंतर 2000 रुपयांची नोट काही दिवसांत बाजारात उपलब्ध झाली होती. ...
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि, 17 - नोटाबंदीचा निर्णय लागू केल्यानंतर 2000 रुपयांची नोट काही दिवसांत बाजारात उपलब्ध झाली होती. मात्र 500 रुपयांची नवीन नोटचे स्वरुप कसे असेल?, याबाबत देशवासीयांमध्ये कमालीची उत्सुकता होता.
अखेर आज बाजारात 500 रुपयांचीदेखील नवीन नोट उपलब्ध झाली आहे. 500 रुपयांची जुनी नोट आणि सध्याच्या चलनात असलेल्या 100 रुपयांच्या तुलनेत 500 रुपयाची नवीन नोट आकाराने लहान आहे. 500 रुपयांच्या नवीन नोटवरीलदेखील 'लाल किल्ला' आणि 'स्वच्छ भारत अभियान'चे चिन्ह छापण्यात आले आहे.
काळा पैसा हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाची घोषणा 8 नोव्हेंबर रोजी केली. यानंतर सुट्या पैशांअभावी सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्यात परिणाम होऊ लागले आहेत. जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकांबाहेर तोबा गर्दी होत आहे. नागरिक तास-न्-तास बँक, एटीएम सेंटरबाहेरील रांगेत उभे राहत आहेत. त्यामुळे आता 500 रुपयांची नवीन नोट बाजारात दाखल झाल्याने नोटांच्या कमतरतेचा प्रश्न लवकर सुटेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
(व्हिडीओ - पुष्कर कुलकर्णी)
https://www.dailymotion.com/video/x844i96