VIDEO : मुंबईतील जसलोक रुग्णालयाबाहेर वाहनांचा गोंगाट
By Admin | Published: April 9, 2017 07:17 AM2017-04-09T07:17:52+5:302017-04-09T07:54:00+5:30
ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 09 - रुग्णालयांच्या परिसरात सायलेंट झोन (शांतता क्षेत्र) असल्यामुळे वाहनचालकांनी आवाजाची न्यूनतम मर्यादा पाळावी, असा ...
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 09 - रुग्णालयांच्या परिसरात सायलेंट झोन (शांतता क्षेत्र) असल्यामुळे वाहनचालकांनी आवाजाची न्यूनतम मर्यादा पाळावी, असा न्यायालयाचा आदेश आहे. मात्र, मुंबईतील जसलोक रुग्णालयाबाहेर वाहनचालकांनी शांतता क्षेत्राचे उल्लंघन केल्याचे रविवारी पहाटेच्या सुमारास पहायला मिळाले.
मुंबईत रुग्णालये, शाळा आणि न्यायालय या परिसरात शांतता क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. तसेच, त्याठिकाणी शांतता क्षेत्र म्हणून फलक सुद्धा लावण्यात आले आहेत. मात्र, याकडे सर्रास वाहनचालकांकडून दुर्लक्ष होताना दिसून येते. आज सकाळी साडेचारच्या सुमारास येथील जसलोक रुग्णालयाबाहेर रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली होती. यावेळी वाहनांच्या आवाजाच्या पातळीने कमाल मर्यादा गाठलेली निदर्शनास आली. तसेच, याच रस्त्यावरुन जाणा-या एका रेसिंग बाईकचा आवाज आणि इतर वाहनांचा कर्णकर्कश हॉर्न ऐकू येत होता. हा प्रकार जवळपास एक तासाहून अधिक वेळ चालू होता.
दरम्यान, शांतता क्षेत्राचे उल्लंघन करणा-या अशा वाहनचाकांवर कारवाई करण्याचेही आदेश सुद्धा न्यायालयाने वाहतूक पोलिसांना दिले आहेत. मात्र, अशी कारवाई होताना दिसत नाही.
https://www.dailymotion.com/video/x844vko