VIDEO : नोटबंदीमुळे माझ्या सिनेमाचे नुकसान झाले तरी चालेल
By admin | Published: November 12, 2016 06:17 PM2016-11-12T18:17:32+5:302016-11-12T18:14:46+5:30
आमीर खान म्हणतो नोटबंदीमुळे माझ्या सिनेमाचे नुकसान झाले तरी चालेल.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा हद्दपार करण्यासाठी 8 नोव्हेंबर रोजी चलनातून 500, 1000 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मोदींचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असून सर्व स्तरातून त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानदेखील पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
'500, 1000 रुपयांच्या नोटा रद्द झाल्यामुळे सध्या नागरिकांना काही प्रमाणात त्रास होत आहे. मात्र ही समस्या अल्पकालीन आहे. घेण्यात आलेला निर्णय देश हिताच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. तसेच, नोटबंदीच्या निर्णयामुळे माझ्या सिनेमाचे नुकसान झाले तरी चालेल', असं आमीर खान म्हणाला आहे.
500, 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्याचा फटका सध्या सिनेमांसहीत सिनेमागृह आणि मल्टिप्लेक्सलादेखील बसत आहे. सुट्टे पैसे नसल्याने सिनेरसिकांनी सिनेमागृहांकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे.
#WATCH: Amir Khan talks about govt's decision of scrapping Rs 1000/500 currency notes & how will this initiative benefit the nation pic.twitter.com/TtDCWoRysj
— ANI (@ANI_news) 12 November 2016
What people are facing is shot term problem, it is imp for India. I've no problem even if it affects my film: Amir Khan on #DeMonetisation
— ANI (@ANI_news) 12 November 2016