VIDEO : विद्यार्थ्यांनी बनवली चिऊ ताईंसाठी घरटी
By Admin | Published: April 22, 2017 02:10 PM2017-04-22T14:10:39+5:302017-04-22T14:58:40+5:30
ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 22 - पर्यावरण मित्र, चिवचिव मंडळ, राष्ट्रीय हरित सेना, पर्यावरण, शिक्षण केंद्रच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वसुंधरादिनानिमित्त ...
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 22 - पर्यावरण मित्र, चिवचिव मंडळ, राष्ट्रीय हरित सेना, पर्यावरण, शिक्षण केंद्रच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वसुंधरादिनानिमित्त चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी बनवली आहेत. जिल्हा परिषद शाळा कामरगावच्या मुख्याध्यापिका सुरेखा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण मित्र गोपाल खाडे, निता तोडकर यांनी या दिनाचे आयोजन केले होते. सगळ्यात आधी गोपाल खाडे, नितीन तोडकर यांनी घरटी बनवण्याची कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता वापरुन पृष्ठाच्या खोक्याचे, टाकाऊ वस्तूंचा वापर करुन विविध आकार रुपात व रंगात घरटी बनवली.
विद्यार्थ्यांनी फक्त घरटी बनवून त्यावर विविध पर्यावरण संदेशही लिहिले. यामध्ये वसुंधरेला वाचवा, पाणी, हवा, प्रदुषित करू नका, निसर्गाचा समतोल ढळू देऊ नका, झाडे, प्राणी पक्षांवर प्रेम करण्याचे आवाहन या उपक्रमाद्वारे करण्यात आले आहे. पक्षी हा वसुंधरेचा महत्त्वपूर्ण घटक असल्याने वसुंधरेला नक्कीच ही भेट आवडेल यात शंकाच नाही. वसुंधरादिनानिमित्त विद्यार्थ्यांनी चिमण्यांसाठी बनवलेली घरटी आता परिसरात लावणार आहेत.
यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लागणार असल्याचे मत मुख्याध्यापिका सुरेखा देशमुख यांनी व्यक्त केले. कार्यशाळेसाठी निर्मला शेरेकर, विलास रुईकर, संजीवनी सोळंके, माधुरी दुधे, ममता जयस्वाल, पुष्पा व्यवहारे, अंजु भोयर, व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना बक्षीसेही देण्यात आली. विश्वास सोनावणे, साक्षी लाकडे, पायल भजभुजे अशी विजेत्यांची नावं आहेत. तर प्रोत्साहन म्हणून समीक्षा नागोसे, गौरव कानतोडे, निकसी मेश्राम, भुषण अंभोरे, मृणालीनी जुननकार व काळे यांना सन्मानीत करण्यात आले.
https://www.dailymotion.com/video/x844vzr