VIDEO - पोलीस स्मृति दिनानिमित्त हौतात्म्यांना मान्यवरांकडून आदरांजली

By admin | Published: October 21, 2016 06:58 PM2016-10-21T18:58:49+5:302016-10-21T18:58:49+5:30

कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मृतीस आज पोलिस प्रशासनाच्यावतीने स्मृतिस्तंभावर मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र

VIDEO - On the occasion of the Police Memory Day, the devotees respected the dignitaries | VIDEO - पोलीस स्मृति दिनानिमित्त हौतात्म्यांना मान्यवरांकडून आदरांजली

VIDEO - पोलीस स्मृति दिनानिमित्त हौतात्म्यांना मान्यवरांकडून आदरांजली

Next

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर दि. 21 : कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मृतीस आज पोलिस प्रशासनाच्यावतीने स्मृतिस्तंभावर मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन देशातील 473 पोलीस हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या 3 फैऱ्यांची सलामी देण्यात आली. पोलीस बँड पथकाने बिगूल वाजवून मानवंदना दिली.

पोलीस दलातील ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झाले त्यांच्या स्मृतिस आज पोलीस स्मृतीदिनानिमित्त येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. जी. अवचट, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, अप्पर पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा, डॉ. दिनेश बारी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. 

Web Title: VIDEO - On the occasion of the Police Memory Day, the devotees respected the dignitaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.