Video : एकनाथ शिंदे आणि आमदारांमधील संभाषणाचे व्हिडीओ आले समोर; हॉटेलवर नेमकी कशावर चर्चा?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 08:55 PM2022-06-22T20:55:30+5:302022-06-22T20:55:50+5:30
राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे.
राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. दरम्यान, राज्यातील राजकीय वातावरण आता ढवळून निघालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक आणि अन्य आमदार दिसत आहे. हॉटेलमध्ये एका सर्व आमदार एकत्र असल्याचंही त्यात दिसत आहे. नुकतंच एकनाथ शिंदे यांनीही ट्वीट करत काही संकेत दिले. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून संवाद साधत बंडखोरी केलेल्या आमदारांना भावनिक साद घातली. तुम्हाला मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल, तर तसे समोर येऊन सांगा. माझा राजीनामा मी तयार ठेवतो. केवळ मुख्यमंत्री नाही, तर शिवसेना पक्षप्रमुख पद सोडायलाही मी तयार आहे. मात्र, हे सगळं तुम्ही समोर येऊन सांगा. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल तर काय करायचं, असा प्रश्न करत, वर्षा बंगला सोडून आता मी मातोश्रीवर जातो, असे सांगत अनेक भावनिक मुद्द्यांना हात घातला. यानंतर एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर ट्विटरवरून चार मुद्दे मांडत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला उत्तर दिले.
एकनाथ शिंदे आणि आमदारांमधील संभाषणाचे व्हिडीओ आले समोर; हॉटेलवर नेमकी कशावर चर्चा?#EknathShinde#Maharashtrapic.twitter.com/VYNIJEXsCh
— Lokmat (@lokmat) June 22, 2022
˘एकनाथ शिंदे आणि आमदारांमधील संभाषणाचे व्हिडीओ आले समोर; हॉटेलवर नेमकी कशावर चर्चा? (2)#EknathShinde#Maharashtrapic.twitter.com/OcCX00VNUh— Lokmat (@lokmat) June 22, 2022
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे, असे ४ मुद्द्यांचे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केला. याशिवाय या ट्विटला हिंदुत्व फॉरेव्हर असा हॅशटॅगही जोडला. एकनाथ शिंदेंची भूमिका पाहता, उद्धव ठाकरे यांनी साद बंडखोर आमदारांना अमान्य असून, पक्ष प्रमुखांचा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.