VIDEO : गंगापूर धरणामध्ये केवळ २०.६४ टक्केच पाणीसाठा शिल्लक
By Admin | Published: June 20, 2017 09:02 PM2017-06-20T21:02:46+5:302017-06-20T21:34:50+5:30
ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 20 - नाशिककरांची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाण्याची पातळी दररोज कमी होत असून पाऊस सलगपणे ...
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 20 - नाशिककरांची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाण्याची पातळी दररोज कमी होत असून पाऊस सलगपणे होत नसल्यामुळे चिंता वाढली आहे. सुरूवात जरी दमदार झाली असली तरी पावसाने विश्रांती घेतली आहे. मान्सून सरींचा जोरदार वर्षाव अद्याप होत नसल्याने नाशिककर चिंंतेत आहेत. गंगापूर धरणाच्या पाण्याची पातळी वीस टक्क्यांवर आली आहे. धरणामध्ये एक हजार १६२ दलघफू इतका पाणीसाठा शिल्ल क राहिला आहे. धरणसमुहातील काश्यपी धरणाचाही पाणीसाठा कमी झाला आहे. शहराला दररोज साधारण १५दलघफू इतके पाणी लागते. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा आणि पाण्याची दररोज भासणारी गरज याचे गणित समाधानकारक आहे. पुढील साठ दिवस तरी नाशिककरांवर पाणीटंचाईची वेळ येणार नसल्याचे दिसते; मात्र पावसाने ओढ दिल्यास महापालिका प्रशासनाला पाणीटंचाईबाबत विचार करावा लागू शकतो.