VIDEO - राज्यातील भुलाईचे एकमेव मंदीर आकोटात

By admin | Published: September 20, 2016 05:16 PM2016-09-20T17:16:50+5:302016-09-20T17:16:50+5:30

गणेशोत्सव संपला की विदर्भात भलाई किंवा भुलाबाईचा जागर सुरू होतो. घराघरातील चिमुकल्या मुली भुलाईचे गाणे म्हणत हा उत्सव कोजागीरी पोर्णीमेपर्यंत साजरा करतात

VIDEO - The only temple in the state of Bhuj | VIDEO - राज्यातील भुलाईचे एकमेव मंदीर आकोटात

VIDEO - राज्यातील भुलाईचे एकमेव मंदीर आकोटात

Next

विजय शिंदे/ आॅनलाईन लोकमत
आकोला, दि. २० : गणेशोत्सव संपला की विदर्भात भलाई किंवा भुलाबाईचा जागर सुरू होतो. घराघरातील चिमुकल्या मुली भुलाईचे गाणे म्हणत हा उत्सव कोजागीरी पोर्णीमेपर्यंत साजरा करतात. एल्क लिंबु झेलू बाई, दोन लिंबु झेलु, कारल्याला कारले येऊ दे की, सुनबाई मग जा आपुल्या माहेरा...अशा अनेक पारंपारीक लोकगितांचा आवाज रोज संघ्याकाळी घराघरात घुमतो, राधा कृष्णाच्या रूपातील मातीच्या मुर्तींची भुलाईच्या रूपाने प्रतिष्ठापना केली जाते. भुलाईचे मंदिर कुठे आढळत नाही अपवाद फक्त अकोला जिल्ह्यातील अकोटचा .

पौराणिक वारसा असलेल्या आकोट शहरात पुरातण काळातील भुलजा-भुलाईचे अतिप्राचीन असे एकमेव मोठे मंदीर आहे. भुलजा-भुलाई मंदीर हे महाभारतात उल्लेख असलेल्या तपेश्वरी मंदीराजवळ भवानी पुरात आहे.या मंदीरातील पुर्वी अवाढव्य स्वरूपातील मुर्ती होत्या.त्या मुतीर्ची पडझड झाल्याने हा धार्मिक व ऐतिहासिक वारसा जपण्याकरीता नवीन मुर्ती स्थापन करण्यात आल्या.भाद्रपद शुध्द पौणिमा ते अश्विन शुध्द पौणिमेपर्यत लहान मुली या मंदीरात बाहुल्याची गाणी, आरती व खाऊ वाटप करून महीनाभर उत्सव साजरा करतात.

या भुलजा-भुलाई मंदीर परिसरातच विरंचना माता,गणपती,नागदेवता, हनुमान व महादेवाची पिंड आहे. या मंदीरात दुरदुरचे भाविक आपल्या मुलीना दर्शनाकरीता आणतात. सदर मंदीर हे प्रसिध्द असुन मंदीराची देखभाल ज्ञानदेव उत्तमआप्पा कुरवाडे हे देखभाल करतात.

Web Title: VIDEO - The only temple in the state of Bhuj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.