VIDEO - मुंढेगाव येथे चित्रनगरी उभारण्यास ग्रामस्थांचा विरोध

By admin | Published: August 23, 2016 04:45 PM2016-08-23T16:45:06+5:302016-08-23T17:46:48+5:30

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे चित्रनगरी उभारण्यास स्थानिक सरपंचासह ग्रामस्थांनी विरोध केला असून ही जमीन गायरान कुरण असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पशुधन

VIDEO - Opponents of the villagers to set up Shanti Nagar in Mundhegaon | VIDEO - मुंढेगाव येथे चित्रनगरी उभारण्यास ग्रामस्थांचा विरोध

VIDEO - मुंढेगाव येथे चित्रनगरी उभारण्यास ग्रामस्थांचा विरोध

Next

सुनील शिंदे

नाशिक, दि. २३ : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे चित्रनगरी उभारण्यास स्थानिक सरपंचासह ग्रामस्थांनी विरोध केला असून ही जमीन गायरान कुरण असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पशुधन असल्याने त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने ही जमीन चित्रनगरी साठी वापरू नये अशी मागणी होत आहे.

शासनाने इगतपुरी तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावर असणा-या मुंढेगाव येथील ग्रामपंचायतच्या ताब्यात असणारी तब्बल चारशे एकर गायरान जमीनवर चित्रनगरी उभारण्याचे शासनाच्या विचारधीन आहे. या ठिकाणी चित्रनगरी उभारू नये अशी मागणी मुंढेगाव ग्रामपंचायतसह ग्रामस्थाकडून होत आहे.दरम्यान दुसऱ्या बाजूला शासनाने चित्र नगरी उभारण्यास कोट्यवधी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतने आपली विरोधाची भूमिका स्पष्ट केली आहे.
इगतपुरी तालुक्यात मुंढेगाव शिवारात महामार्गालगत असणारी गायरान जमीन शासनाने विविध प्रयोजनासाठी वापरली असताना आता शिल्लक असलेल्या चारशे एकर जागेवर चित्रनगरी उभारण्याचे शासनाच्या चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या विचारधीन आहे.त्यासाठी कार्यवाही सुरु झाली असून,या बाबीला स्थानिक ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी कडवा विरोध दर्शविला आहे.

शासनाने या जागेवर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी चार हेक्टर, आदिवासी विकास विभागाकरिता २.२० हेक्टर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासाठी १८५० चौरस मीटर भौगोलिक सुधारणा पाणी आणि हायवे साठी १.१०० हेक्टर क्षेत्र, राखीव भूसरल परिवहन भारत सरकार साठी ४९५६ चौरस मिटर व जिल्हास्तरीय व विभाग स्तरीय प्रशिक्षण केंद्र आदी बाबीसाठी शासनाने जागा घेतल्यानंतर उर्विरत जागा चित्रनगरी साठी ताब्यात घेण्याचे शासनाचे धोरण आहे. ही जमीन ताब्यात घेतल्यास ज्या उद्देशासाठी ही जमीन स्थानिक ग्रामपंचायत ने राखून धरली आहे तो संपुष्टात येईल. ही जमीन गायरान कुरण असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पशुधन असल्याने त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने ही जमीन चित्रनगरी साठी वापरू नये अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया

श्री.चंद्रकांत गतीर (सरपंच)
गायरान असलेल्या या जमिनीला शासनाने विविध उपक्र मासाठी ताब्यात घेतले आहे.यातील अनेक उपक्र म नामधारी राहिले आहेत. फक्त शासनाचे वर्षानुवर्ष फलक लावून ही जमीन आरिक्षत केली आहे.त्यामुळे ही जमीन ग्रामपंचायतच्या वापराविना पडून आहे. याठिकाणी शिल्लक असणा-या जमिनीवर चित्रनगरी उभारण्याचे शासनाचे धोरण असून यामुळे परिसरातील पशूधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने चित्रनगरी उभारण्यास ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचा कडवा विरोध आहे.

श्री.गोविंद गतीर (ग्रामस्थ)
इगतपुरी तालुक्यातील महत्वाच्या सुपीक शेतजमिनी शासनांने विविध प्रकल्पासाठी संपादित केल्या आहेत.मात्र शिल्लक असलेल्या जागेवरही शासनाचा डोळा असून या जमिनीही ताब्यात घेऊन त्यावर प्रकल्प उभारण्याचे शासनाचे धोरण आहे.ही बाब गंभीर असून आता मुंढेगाव च्या साडेचारशे एकर जागा चित्र नगरी साठी शासम ताब्यात घेत आहे.हि जागा गायकुरण असल्याने तालुक्यातील हजारो जनावराना चार्या चा आण िपशुधनाचा पोषणाचा प्रश्न निर्माण होणार आहे.यामुळे हि चित्रनगरी या ठिकाणी उभारू नये अशी आमची मागणी आहे.

श्री.विनोद दळवी(ग्रामस्थ)
मुंबई आग्रा महामार्गावर राज्याच्या राजधानी पासून दीड तासाच्या अंतरावर आण िजिल्ह्याच्या ठिकाणापासून वीस किलोमीटर अंतर्रावर हि चित्र नगरी उभारण्याचे शासनाचे धोरण आहे.याबाबत कार्यवाही सुरु झाली असली तरी शासनाने प्रथम ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या शी समन्वय साधने आवश्यक होते.स्थानिकांना विश्वासात न घेता शासनाने एकतर्फी निर्णय घेतला असून शासनाने प्रथम स्थानिकांच्या हरकती जाणून घाव्या व नंतर निर्णय घ्यावा.अन्यथा या ठिकाणी चित्र नगरी होऊ देणार नाही .

Web Title: VIDEO - Opponents of the villagers to set up Shanti Nagar in Mundhegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.