VIDEO : कोल्हापूरमध्ये भरलंय 'एस.टी'चा इतिहास सांगणारं प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2016 03:22 PM2016-10-18T15:22:41+5:302016-10-18T15:33:58+5:30
एस.टी.च्या इतिहासाचा प्रवास एकाच छताखाली तेही एस.टी. बसमध्ये पाहण्यास मिळावा यासाठी एक प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. १८ - बेडफोर्ट (१९४८) ते अश्वमेध (२०१६) एक प्रवास.. एसटी मित्र संघटना उलगडतेय लाल परीचा प्रवास... गावोगावी धुरळा उडवत जाणारा 'लाल डबा' ते आजच्या अनेक खासगी बसेसना तोंड देणारी शिवनेरी, अश्वमेध व वातानुकूलीत शिवशाहीपर्यंतचा प्रवास. !
एस.टी. मित्र युवकांनी एकत्र येऊन एस.टी.च्या इतिहासाचा प्रवास एकाच छताखाली तेही एस.टी. बसमध्ये पाहण्यास मिळावा, या उद्देशाने अनोखे असे ‘एस.टी.चा एक प्रवास... बेडफोर्ड (१९४८) ते अश्वमेध २०१६’ प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख बसस्थानकांवरील एस. टी.प्रेमी संघटना आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यातर्फे ‘एस. टी. विश्व’ हे फिरते प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात १९४८ पासून अर्थात एस.टी.च्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या विविध स्थित्यंतरांचे दर्शन प्रवाशांना होणार आहे. एस. टी. बसची विविध मॉडेल्स, एस. टी.चा इतिहास, विविध योजनांची माहिती, प्रवाशांचे रंजक अनुभव अशा अनेक गोष्टी या प्रदर्शनात फोटो व वस्तूंच्या माध्यमातून मांडण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन पाहण्यासाठी विनामूल्य खुले आहे.