VIDEO- शेततळ्यांनी नगावला केले आबादानी

By Admin | Published: December 29, 2016 08:28 PM2016-12-29T20:28:26+5:302016-12-29T20:32:59+5:30

ऑनलाइन लोकमत अमळनेर, दि. 29 - राज्यात सर्वाधिक ५० शेततळे बनविण्याचा विक्रम करणाऱ्या नगावची जलपातळी पहिल्याच पावसात दोन ...

VIDEO: Plantage | VIDEO- शेततळ्यांनी नगावला केले आबादानी

VIDEO- शेततळ्यांनी नगावला केले आबादानी

Next

ऑनलाइन लोकमत
अमळनेर, दि. 29 - राज्यात सर्वाधिक ५० शेततळे बनविण्याचा विक्रम करणाऱ्या नगावची जलपातळी पहिल्याच पावसात दोन मीटरने वाढली आहे. १५ ते २० टक्के प्रमाणात घेण्यात येणारी रब्बी पिके आता १०० टक्के घेता येऊ लागली आहेत. या शेततळ्यांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडली आहे.
जलयुक्त शिवार अभियानात निवड झाली नाही म्हणून गाव टॅँकरमुक्त करण्याचा निर्धार घेत सरपंच बापू कोळी यांनी स्वखर्चाने मोठे शेततळे उभारले. प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका कृषी अधिकारी बी. जी. पाटील यांच्या मदतीने शासनाच्या मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत शेतकऱ्यांना महत्त्व पटवून ५० शेततळे करण्याचा संकल्प केला. रात्रंदिवस कामात सातत्य ठेवून तब्बल ५० शेततळे पूर्ण केले. गावशिवारातून वाहून जाणारे शेतातील पाण्याचे प्रवाह व नाल्याचे प्रवाह यांना एकत्र सलग आठ शेततळ्यांनी जोडले. गावच्या पाणी पुरवठा विहिरीजवळदेखील दोन शेततळे केले.
शेततळ्यांमुळे ११३.१० टी.एम.सी जलसाठा झाला. आणि विहिरींची जलपातळी दोन मीटरने वाढली. मेगारिचार्ज त्याचप्रमाणे बापू कोळी, सोबत दिनेश गुलाबराव पाटील, यांनी तीन वर्षांपूर्वी कोरड्या विहिरीत डबर, मुरूम टाकून पाणी सोडून भुजल पातळी वाढवली होती. त्याच धर्तीवर त्यांनी त्यांच्या शेततळ्याजवळ शिवरस्त्यावर स्वखर्चाने ६० फूट लांब,३० फूट रूंद आणि २७ फूट खोल खड्डा खोदला. त्यात दोन फूट डबर टाकून खालून पाईपलाईन टाकून नदीचे वाहून जाणारे पाणी मेगा रिचार्ज खड्यात सोडले. तसेच डबर, मुरूम, रेती टाकून २५ केसींग पाईप टाकून शेतशिवारातील वाहून जाणारे पाणी खड्ड्यात उतरविले. परिणामी जलपातळी वाढली.
>विभागीय आयुक्तांकडून कौतुक
या शेततळ्यांची पहाणी करण्यासाठी नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी आज नगावला भेट दिली. त्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले. तसेच नगाव पॅटर्न नाशिक विभागासाठी मार्गदर्शक ठरेल असे सांगितले.

https://www.dailymotion.com/video/x844mur

Web Title: VIDEO: Plantage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.