VIDEO : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची बालात्रिपुरसुंदरी रुपात पूजा
By Admin | Published: October 8, 2016 05:13 PM2016-10-08T17:13:02+5:302016-10-08T17:16:32+5:30
शारदीय नवरात्रौत्सवाच्या आठव्या माळेला (शनिवार)करवीर निवासिनी श्री अंबाबाईची बाला त्रिपूरसुंदरी रुपात पूजा बांधण्यात आली
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ८ - शारदीय नवरात्रौत्सवाच्या आठव्या माळेला (शनिवार)करवीर निवासिनी श्री अंबाबाईची बाला त्रिपूरसुंदरी रुपात पूजा बांधण्यात आली. शुक्रवारी बांधण्यात आलेले त्रिपूरसुंदरी हे देवीचै प्रौढ स्वरुप आहे. बाला त्रिपूरसुंदरी हे तिचे बाल्य स्वरुप आहे. बाला त्रिपुरसुंदरीला महात्रिपूरसुंदरीची कन्या मानले आहे. महाकामेश्वर शिवापासून महाकामेश्वरी त्रिपूरसुंदरीला जे कन्यारत्न प्राप्त झाले तिच ही बालाम्बिका. प्रसिद्ध भण्ड आख्यानानुसार भण्डासुराचा नाश करण्यासाठी महात्रिपूरसुंदरी आणि तिची कन्या बालाम्बिका यांनी महापराक्रम गाजवला. भण्डासुराचे सर्व पुत्र बालाम्बिकेने नष्ट केले. बालाम्बिका ही कुमारिका स्वरुप असल्याने तिला शुद्ध ज्ञानस्वरुप मानले आहे. त्यानुसार तिला सहसा अक्षमाला, पुस्तक, आणि वरद-अभय मुद्रा यासह दाखवले जाते. ही लाल वस्त्रे नेसून लाल कमळात विराजमान असते. आजची ही पूजा संजीव मुनिश्वर, आशुतोष जोशी, सुशील